‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा

आयसीएमआरने ऑगस्टपासून भारतात 1 कोटी नागरिकांचं लसीकरण करून डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याचा दावा केलाय.

‘ऑगस्टपासून दररोज 1 कोटी लोकांचं लसीकरण होणार, डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार’, ICMR चा दावा
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 8:20 PM

नवी दिल्ली : देशात कोरोनाची (Corona Virus) दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच कोरोनाच्या आकड्यांमध्ये आता घट होताना दिसत आहे. मात्र, कोरोनाचा धोका अद्यापही तितकाच आहे. त्यामुळेच वेगाने कोरोना लसीकरण होणं हाच एकमेवर पर्याय असल्याचं तज्ज्ञ सांगतात. मात्र, मागील अनेक दिवसांपासून भारतातील लसीकरणाचा वेग अत्यंत कमी आहे. त्यावरुन विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. आता आयसीएमआरने ऑगस्टपासून भारतात 1 कोटी नागरिकांचं लसीकरण करून डिसेंबरपर्यंत लसीकरण पूर्ण करणार असल्याचा दावा केलाय. त्यामुळे लवकरच पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे (IMCR claim 1 crore Corona vaccine dose per day from August 2021).

आयसीएमआरने (ICMR) दावा केला, “देशात लसींचा तुटवडा नाही. जुलै-ऑगस्टच्या मध्यापर्यंत दररोज एक कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी लसी उपलब्ध करुन दिल्या जातील. तसेच डिसेंबरपर्यंत देशातील सर्व नागरिकांना लस दिली जाईल.”

आरोग्य विभागाचे सचिव लव अग्रवाल म्हणाले, “देशात आतापर्यंत एकूण 21.60 कोटी कोरोना लसी देण्यात आल्यात. यात 1.67 कोटी डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना, 2.42 कोटी डोस फ्रंटलाईन वर्कर्सला, 15.48 कोटी डोस 45 वर्षांवरील नागरिकांना आणि 2.03 कोटी डोस 18-44 वर्षे वयोगटातील नागरिकांना देण्यात आलेत.” सरकारने लसींची उपलब्धता वाढवणार असल्याचा दावा केला असला तरी कोव्हिशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतरात मी करण्याबाबत कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. कोव्हिशील्डचे दोनच डोस दिले जाणार आहेत. पहिल्या डोसनंतर 12 आठवड्यांनी दुसरा डोस दिला जाणार आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांहून अधिक घट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही कोरोना रुग्णांच्या संख्येत 50 टक्क्यांहून अधिक घट झाल्याचं सांगितलंय. एका दिवसात कोरोनाच्या सक्रीय कोरोना रुग्णांमध्ये 1.3 लाख रुग्णांची घट झालीय. दुसरीकडे 30 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही सातत्याने कोरोना रुग्ण कमी होत आहेत. मागील 24 तासात 1 लाख 27 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालीय. 28 मे रोजी देशात एकूण 2 लाखपेक्षा कमी रुग्णांची नोंद झालीय. आता कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या बाधित होणाऱ्यांपेक्षा अधिक आहे. दर आठवड्याला सरासरी 20 लाख चाचण्या केल्या जात आहेत.

बरे होणाऱ्यांचं प्रमाण (recovery rate) 92 टक्के

आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी लव अग्रवाल म्हणाले, “1 जून रोजी सक्रीय रुग्णांची संख्या घटून 18.9 लाखपर्यंत पोहचलीय. 10 मे रोजी ही संख्या 37 लाख इतकी होती. रिकव्हरी रेट वाढून तो आता 92 टक्के झालाय.

हेही वाचा :

विद्यार्थ्यांसाठी दोन डोसमधील कालावधी कमी करा, मुंबई मनपाचं केंद्राल पत्र

सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, मग केंद्राची परवानगी का नाही? काँग्रेसचा सवाल

Covid-19 : लसीचे साईड इफेक्ट्स कमी करण्यासाठी करा या टिप्स फॉलो, कोणतीही अडचण येणार नाही

व्हिडीओ पाहा :

IMCR claim 1 crore Corona vaccine dose per day from August 2021

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.