Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : हवामानात मोठे बदल, भारतातील ‘या’ भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता

भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात 9 मार्च रोजी काही ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे

Weather Alert : हवामानात मोठे बदल, भारतातील 'या' भागांमध्ये पाऊस आणि गारपीटीची शक्यता
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 09, 2021 | 4:20 PM

नवी दिल्ली : थंडीचे दिवस संपले असून आता हळूहळू तापमानाचा पारा चढत आहे. उत्तर भारतात तर कडाक्याच्या उन्हाने उन्हाळ्याची जाणीव करुन देण्यास सुरुवात केलीय. देशभरातील बहुतांश ठिकाणी तापमान वाढत आहे. मात्र, याच काळात आता हवामान पुन्हा एकदा बदलण्यास सुरुवात झालीय. भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवलेल्या अंदाजानुसार देशात 9 मार्च रोजी काही ठिकाणी पाऊसाची शक्यता आहे (IMD weather alert of India possibility of rain snow).

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पश्चिम हिमालयीन भागात (Western Himalayan) 9 मार्च रोजी पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. उत्तर पाकिस्‍तानच्या वरील भागात हवामानात बदल झाल्याने हा परिणाम होत आहे. त्यामुळेच संपूर्ण पश्चिम हिमालयीन भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडण्याची शक्यता आहे. 10 ते 12 मार्च दरम्यान पश्चिम हिमालयात विजांच्या कडकडाटात पाऊस होऊ शकतो.

भारतात कोठेकोठे पाऊसाचा अंदाज?

IMD ने दिलेल्या माहितीनुसार 11 ते 13 मार्चपर्यंत उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशामध्ये सौम्य प्रकारचा पाऊस होऊ शकतो. याशिवाय 11 आणि 12 मार्च रोजी जम्‍मू काश्‍मीर, लद्दाख, गिलगित, बाल्टिस्‍तान, मुजफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये पावसाची शक्यता लक्षात घेऊन तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 9 ते 11 मार्च दरम्यान अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊसाचा अंदाज आहे.

राजधानी दिल्लीतील स्थिती काय?

देशाची राजधानी दिल्लीत (Delhi) तापमानात वेगाने वाढ झालीय. दिल्लीत सोमवारी (8 मार्च) 32 डिग्रीपर्यंत तापमान गेलं. हे तापमान सामान्य तापमानापेक्षा डिग्रीने अधिक आहे. दिल्लीत आज (9 मार्च) ढगाळ वातावरण राहू शकतं. दिल्लीतही 12 मार्च रोजी सौम्य पाऊसाची शक्यता आहे.

हेही वाचा :

Weather report Maharashtra : मुंबईत मार्चमधील विक्रमी तापमान, थंडी-ऊन-वाऱ्याने रत्नागिरीकर कन्फ्युज

Weather Alert : राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा

Weather Alert : दिल्ली गारठली, महाराष्ट्र कुडकुडणार? काय आहे हवामानाच अंदाज

व्हिडीओ पाहा :

IMD weather alert of India possibility of rain snow

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.