Rain Alert: एप्रिलमध्येच आस्मानी संकट, शनिवारी कुठे कुठे मुसळधार? हवामान खात्याचा इशारा काय?
हवामान खात्याने (IMD) भारतात पुढील २४ तासांत मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होण्याचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट तर ईशान्य भारतात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव १२ एप्रिलपर्यंत राहील, ज्यामुळे अनेक राज्यांना पावसाचा सामना करावा लागू शकतो. गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आयएमडीने अनेक राज्यांसाठी अलर्ट जारी केले आहेत.

Rain Alert: देशात पुन्हा एकदा हवामान बदलणार आहे. ईशान्य भारतात तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येत्या 24 तासांत अनेक भागात हवामान पूर्णपणे बदलेल, असे आयएमडीने म्हटले आहे. पुढील 24 तासांत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आयएमडीनुसार, एक पश्चिमी विक्षोभ सक्रिय झाला आहे. त्याचा परिणाम 12 एप्रिलपर्यंत दिसून येऊ शकतो, त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.त्यामुळे एप्रिलमध्येच अस्मानी संकट येऊ शकतं.
उत्तर भारतातील राज्यांत हीटवेव्ह अलर्ट
हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट जाणवत आहे. अनेक भागात उष्णतेची लाट आहे. उष्णतेच्या लाटेबाबत, आयएमडीचे शास्त्रज्ञ डॉ. नरेश कुमार म्हणाले, “गुजरातमध्ये सुमारे एक आठवड्यापासून उष्णतेची लाट आहे, आयएमडीने याबद्दल रेड अलर्ट जारी केला होता.ते म्हणाले की, वायव्य भारतातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आजही जारी करण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव वाढेल, असे त्यांनी सांगितले. राजस्थानच्या अनेक भागात उष्णतेची लाट कायम राहील. मात्र येत्या 24 तासांमध्ये हवामानत अचानक बदल होऊ शकतो. हवामान विभागाच्या सांगण्यानुसार पंजाब, हरियाणा, दिल्ली मध्ये अचानक हवामान बदलू शकतं.
#WATCH | Delhi | On heatwave conditions in Delhi and North India, IMD Scientist Dr Naresh Kumar says, “There has been a heat wave in Gujarat for about a week and we had issued a red alert for it… Heat wave is expected to continue in Northwest India till today. In the coming two… pic.twitter.com/b9sRqr6Cww
— ANI (@ANI) April 9, 2025
पश्चिमी विक्षोभाचा परिणाम दिसणार
हवामान खात्याने असा अंदाजवर्तवला आहे की एक नवीन पश्चिमी विक्षोभ ॲक्टिव होत आहे. 10 एप्रिलपर्यंत ते पूर्णपणे सक्रिय होऊ शकते. यामुळे उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये ढग बरसून, पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षोभामुळे, पश्चिम आणि उत्तर राजस्थानातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, गडगडाटी वादळे आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, दिल्ली, पंजाब, हरियाणा, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्येही त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो.
देशभरातील हवामान प्रणाली
पश्चिम-मध्य आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे. पुढील काही तासांत ते पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकेल. यानंतर, हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-ईशान्येकडे वळू शकते. येत्या 24 तासांमध्ये मध्य बंगालच्या खाडीवर हे हळूहळू कमी होऊ शकतं. त्याशिवाय दक्षिण तामिळनाडू आणि आग्नेय मध्य प्रदेशपासून पूर्व गंगीय पश्चिम बंगालपर्यंत एक टर्फ लाइन तयार होते. या प्रणालींच्या प्रभावामुळे, अनेक भागात पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
कोणत्या राज्यात बरसणार पाऊस ?
हवामान खात्याच्या सांगण्यानुसार, 9 ते 11 एप्रिल दरम्यान, पूर्व आणि ईशान्य भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, किनारी आंध्र प्रदेश, यानम, केरळ, माहे, तेलंगणा, कर्नाटक आणि मध्य भारतात वादळासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
आयएमडीनुसार, या भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर असू शकतो. अनेक भागात हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
10 एप्रिल रोजी बिहार आणि अरुणाचल प्रदेशात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर, 10 ते 11 एप्रिल रोजी उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये आणि 9ते 11 एप्रिल रोजी आसाम आणि मेघालयात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.