उष्णतेची लाट ओसरणार, तीन दिवसात पारा खाली, आता पावसाचं तांडव; हवामान विभागाची मोठी अपडेट

| Updated on: Jun 26, 2024 | 5:00 PM

पावसाळा सुरू झाल्यानंतर अजूनही उकाडा जाणवत असला तरी आता देशभरातील नागरिकांची या उष्णतेतून सुटका होणार आहे. हवामान विभागाने तशी मोठी बातमी दिली आहे. येत्या दोन तीन दिवसात उष्णतेची लाट ओसरणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

उष्णतेची लाट ओसरणार, तीन दिवसात पारा खाली, आता पावसाचं तांडव; हवामान विभागाची मोठी अपडेट
Weather Update:
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

यंदा देशभरात उष्णतेची प्रचंड लाट होती. अंगाची लाहीलाही करणारा हा उकाडा होता. त्यामुळे देशभरातील जनता चांगलीच होरपळून निघाली. उत्तर भारतापासून ते दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र हेच चित्र होतं. मात्र, आता दक्षिण भारतातील अनेक राज्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. हवामान विभागानेही एक महत्त्वाची गुड न्यूज दिली आहे. देशभरातून उष्णतेची लाट संपणार आहे. येत्या 3 दिवसात तापमान 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत येणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

देशातील नागरिकांना येत्या तीन ते चार दिवसात उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. चार पाच डिग्री पाराही पडणार आहे. उत्तर भारतात तीन चार दिवसांत पूर्णपणे मान्सून सक्रिय होणार आहे. गरज पडल्यास पाच दिवस आधीच अलर्ट जारी केला जाईल, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

पावसाचा पॅटर्न कसा राहील?

यावेळी नॉर्मल ते धुवांधार पाऊस पडू शकतो. चार ते सहा टक्के अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. यंदा एखाद्या भागातच सर्वाधिक पाऊस होणार नाही. काही भागात सर्वसाधारण पाऊस राहील तर काही भागात अधिक पाऊस राहील. उत्तर – पश्चिमेचा थोडा भाग आणि पूर्व भारताच्या काही भागात कमी पाऊस होण्याची शक्यता आहे. इतर भागात पाऊस सामान्य ते अधिक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

वीजांच्या कडकडाटाने मृत्यू

अर्थव्यवस्थेबाबत आम्ही काही बोलू शकत नाही. पण चांगलं पिक यावं म्हणून आमचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी मंत्रालयासोबत वारंवार चर्चा होत आहे. झारखंड, बंगाल, राजस्थान, उत्तराखंड आणि बिहार आदी राज्यात विजांचा प्रचंड कडकडाट होत असतो. त्यामुळे मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे. येणाऱ्या तीन चार दिवसात बिहार, झारखंड आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस यणार आहे. त्यानंतर 5 जुलैनंतर दक्षिण राजस्थानमध्ये मान्सून दाखल होईल, असंही त्यांनी सांगितलं.

या भागात पाऊस येतोय

मान्सून गुजरात आणि मध्यप्रदेशातील काही भागांच्या दिशेने पुढे सरकला आहे. दक्षिण-पूर्व राजस्थानच्या काही भागात आणि पश्चिम उत्तर प्रदेशाच्या दक्षिण भागात सुद्धा मान्सूनने दस्तक दिली आहे. देशातील अनेक भागात जोरदार पाऊस होत आहे.

4-5 दिवसात पश्चिमी तट आणि पूर्वोत्तर भारतात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर येत्या 3-4 दिवसात पश्चिम, मध्य आणि पूर्व भारतातील भागात आणि उत्तर पश्चिम भारतातील काही भागात दक्षिण-पश्चिम मान्सून पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असण्याची संभावना आहे.