Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon : पाऊस तर कधी उन्हाळा, कधी हिवाळ्यातही पडतो, पण मान्सूनच्या पावसाचे गुण अस्सल ते अस्सलच! थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम!

'स्कायमेट' हा हवामान संस्थेने यंदा मान्सून हा सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच यंदा सरासरीच्या तुलनेत 94 ते 104 टक्के पाऊस बरसणार आहे. जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली तर शेती उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात नियमित आणि वेळेत नाही पण सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ ही झालेलीच आहे. यंदा तर अधिकच्या पावसामुळे उन्हाळी पिकेही शक्य झाली होती.

Monsoon : पाऊस तर कधी उन्हाळा, कधी हिवाळ्यातही पडतो, पण मान्सूनच्या पावसाचे गुण अस्सल ते अस्सलच! थेट अर्थव्यवस्थेवर परिणाम!
महाराष्ट्रात पुर्व मोसमी पावसासाठी अनुकूल वातावरणImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 20, 2022 | 6:28 AM

मुंबई :  (Monsoon) मान्सून हा अनिश्चित आणि अनियमित स्वरुपाचा असला तरी त्याच्या असण्याने आणि नसण्याने थेट (Impact on the economy) अर्थव्यवस्थेवरच परिणाम होऊ शकतो. आता मान्सूनचा पाऊस आणि अर्थव्यवस्था यांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या (Agricultural) शेती व्यवसायाचा खरा आधार हा मान्सूनच आहे. त्याच्या आगमनावरही सर्वकाही अवलंबून आहे. भारतातील ग्रामीण भागातील बहुसंख्यलोकसंख्या ही शेती क्षेत्रावर अवलंबून आहे. मान्सून आणि शेती या दोन गोष्टींचा घनिष्ठ संबंध आहे. इतकेच नव्हे तर कृषी क्षेत्राचा डोलाराच हा मान्सूनवर उभा आहे. शेतीचे भवितव्यतच हे मान्सूनच्या वेळापत्रकाप्रमाणे चालते.

सामान्य़ मान्सूनचा शेती व्यवसयावर परिणाम

‘स्कायमेट’ हा हवामान संस्थेने यंदा मान्सून हा सामान्य राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. म्हणजेच यंदा सरासरीच्या तुलनेत 94 ते 104 टक्के पाऊस बरसणार आहे. जर मान्सूनची स्थिती सामान्य राहिली तर शेती उत्पादनात वाढ ही ठरलेली आहे. गेल्या काही वर्षात नियमित आणि वेळेत नाही पण सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने शेती उत्पादनात वाढ ही झालेलीच आहे. यंदा तर अधिकच्या पावसामुळे उन्हाळी पिकेही शक्य झाली होती. त्यामुळे मान्सूनच्या केवळ वातावरणावरही बरेच काही अवलंबून आहे.

यंदाच्या वेळेत आगमनाचा असा हा फायदा

यंदा मान्सून सामान्य तर राहणारच आहे पण वेगळेपण म्हणजे तो वेळेत दाखल होत आहे. याचा देखील शेती उत्पादनावर आणि शेती व्यवसायावर परिणाम होत असतो. केवळ वेळेत मान्सून दाखल झाल्यामुळे वेळेत खरिपाच्या पेऱण्या होऊन उत्पादनात वाढ देखील शक्य आहे. जर पावसाने हुलकावणी दिली तर मात्र, दुबार पेरणी, उत्पादनात घट, उत्पादनावर अधिकचा खर्च यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे मान्सूनच्या पावसावरच शेती व्यवसाय आणि पर्यायाने भारतीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.

हे सुद्धा वाचा

देशाच्या जेडीपीमध्ये 17 टक्के वाटा शेतीचा

देशातील निम्म्याहून अधिक जनतेचा उदरनिर्वाह हा शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मान्सूनच्या अंदाज केवळ शेती व्यवसायाला उभारी देण्यासाठी महत्त्वाचा आहे असे नाही तर यामुळे इतर उद्योगधंदे देखील अप्रत्यक्षरीत्या प्रभावित होत असतात. शेती क्षेत्रातील कोणताही घटक असो त्यावर पावसाचा प्रभाव कायम राहिलेला आहे. शेतीच्या उत्पदनात वाढ होण्यासाठी मान्सून सामान्य किंवा सामान्यापेक्षा अधिक असणे गरजेचे आहे.

खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....