अमित शाहांची खिल्ली उडवली, कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात

मध्यप्रदेशातल्या इंदूरमध्ये स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीला हिंदू रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मानगुटीला पकडून पोलीस ठाण्यात नेलं आहे. (inddur comedian arrested)

अमित शाहांची खिल्ली उडवली, कॉमेडियन थेट पोलीस ठाण्यात
Follow us
| Updated on: Jan 03, 2021 | 9:19 AM

लखनऊ : ही घटना आहे मध्यप्रदेशातल्या इंदूरची. स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारूकीला (Munawar Faruqui) हिंदू रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी मानगुटीला पकडून पोलीस ठाण्यात नेलं. कारण मुनव्वरनं केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची खिल्ली उडवल्याचा आरोप आहे. एवढच नाही तर शो दरम्यान हिंदू देवी देवतांचा मजाक उडवला जात होता असा आरोपही हिंद रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी केलाय. ही घटना इंदूरच्या मुनरो कॅफेत घडली. (in inddur stand up comedian has been arrested because of mocking Union Home Minister Amit Shah)

हिंदू रक्षक दलाची घुसखोरी ?

कॉमेडियन मुनव्वर फारूकीचा कार्यक्रम जाहीर होताच हिंद रक्षक दलाच्या काही कार्यकर्त्यांनी त्याचे तिकिट विकत घेतले आणि कार्यक्रमात प्रवेश केला. मुनव्वर फारूकीनं गोध्रा हत्याकांडावरून अमित शाहांवर टिका टिप्पणी केली तसं हिंद रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांनी त्याला अडवलं. आणि थेट पोलीस ठाण्यात नेलं. लोकांच्या भावना भडकवल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.

कॉमेडियनना हिंदू देवी देवताचा का सापडतात?

कॉमेडियन मुनव्वर फारूकी हा सिरियल ऑफेंडर असल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं केलाय. यापुर्वीही त्याने हिंदू देवी देवता आणि अमित शाहांवर खालच्या भाषेत टिका केल्याचा आरोप आहे. एवढच नाही तर गोध्रा जळीतकांडात मारले गेलेल्या कारसेवकांवरही त्यानं टिप्पणी केल्याचा आरोप हिंद रक्षक दलानं लावलाय.

केरळमध्येही ‘हलाल’वर वाद

एर्नाकुलममध्येही हलालच्या स्टीकरवर वाद झालाय. हिंदू ऐक्य वेदी संघटनेनं एका हलालचं स्टीकर लावणाऱ्या बेकरीवाल्याला ते हटवायला भाग पाडलं. यात चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आलीय.

संबंधित बातम्या :

Kunal Kamra | कॉमेडियन कुणाल कामराविरोधात न्यायलायाच्या अवमान प्रकरणी खटला चालणार, AG कडून परवानगी

Kunal Kamra | अर्णवच्या सुटकेनंतर खोचक ट्विट, कुणाल कामरावर अवमानना खटला दाखल करण्याची मागणी

उखाड दिया मुलाखत… ‘शटअप या कुणाल’च्या सेटवर रंगला कामरा-राऊतांचा सामना

(in inddur stand up comedian has been arrested because of mocking Union Home Minister Amit Shah)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.