भारतात या ट्रेनची लांबी असते प्रचंड मोठी, खेचण्यासाठी चार ते पाच इंजिने लागतात
रेल्वेच्या कारभार मोठा असून भारतीय ट्रेनच्या वैविध्यापैकी एक असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या ट्रेन विषयी माहीती करून घेऊया...
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने वेगवेगळ्या प्रकारचे रेकॉर्ड केलेले आहेत. तुम्ही वेग-वेगळ्या ट्रेन पाहील्या असतील किंवा त्यातून प्रवास केला असेल. काही ट्रेन दिवसाच्या असतात, काही रात्रीच्या धावतात, रोडच्या ट्रॅफिकमध्ये अडकण्यापेक्षा अशा ट्रेनमधून झोपूनही प्रवास करता येत असल्याने लोक दूरच्या प्रवासासाठी रेल्वेला प्राधान्य देत असतात. अशा ट्रेनला स्लीपर कोच लावलेला असतो. ट्रेनला विविध वर्गातील प्रवाशांसाठी विविध श्रेणीचे कोच लावलेले असतात, त्यामुळे ट्रेनची लांबी खूपच मोठी होत जाते. देशातील काही ट्रेन इतक्या मोठ्या आहेत की त्यांना अनेक इंजिन्स जोडण्याची गरज असते.
भारतीय रेल्वेत अनेक प्रकारच्या ट्रेन चालवण्यात येत असतात. देशभरात विविध मार्गावर ट्रेन धावतात. काही ट्रेन इतक्या मोठ्या असतात की त्यांना खेचण्यासाठी चार ते पाच इंजिन्स लावण्याची गरज असते. त्यामुळे आपण पाहूया कोणत्या आहेत या ट्रेन की ज्यांना खेचण्यासाठी इतक्या शक्तीशाली इंजिनांची गरज लागते. त्यामुळे चला पाहुया..
1) शेषनाग ट्रेन शेषनाग ट्रेन ही भारतातील एक अनोखी ट्रेन असून ती देशातील सर्वात मोठ्या ट्रेन पैकी एक मानली जाते. तुम्हाला हे जाणून आश्चर्यचकीत व्हायला होईल की या ट्रे्नची लांबीच 2.8 किमी इतकी मोठी असते की तिला खेचायलाच एका नवे तर चक्क चार ते पाच इंजिनांची लागत लागते. परंतू ही ट्रेन एक मालगाडी आहे. त्यामुळे मालगाडीला खेचण्यासाठी फारच मोठ्या ताकदीची गरज लागते.
2) सुपर वासुकी ट्रेन –
भारतात या ट्रेनला या नावाने फारसे कोणी ओळखतच नाही. तुम्हाला हे जाणून आश्चर्यचकीत व्हायला होईल की भारतातील सर्वात मोठ्या लांबीच्या ट्रेनचे नाव वासुकी आहे. स्वातंत्र्याच्या 75 व्या महोत्सवानिमित्त या ट्रेनची सुरूवात करण्यात आली होती,या ट्रेनला चालविण्यासाठी सहा इंजिनांची गरज असते. या ट्रेनला 20 किंवा 30 डब्बे जोडले जात नाहीत तर तब्बल 295 डब्बे जोडलेले असतात, ज्या डब्यांना एकत्र खेचत ही ट्रेन आरामात धावत असते, या ट्रेनची लांबी साडे तीन किमी असते. ही सुद्धा मालगाडीच आहे.
3) विवेक एक्सप्रेस –
विवेक एक्सप्रेस ही देशातील सर्वात लांबचा प्रवास करणारी प्रवासी ट्रेन आहे. दिब्रुगढ ते कन्याकुमारी असा तिचा लांबचा प्रवासी आहे. ही ट्रेन तिरूवंतपुरम, कोयंमतूर, विजयवाडा सारख्या ठिकाणावरून प्रवास करीत असते. या ट्रेनला 23 डब्बे असतात, 4234 किमीचे अंतर ही ट्रेन कापते. ही प्रवासी ट्रेन असून भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाते.