लसीकरणामुळे 10 वर्षांपासूनचा आजार झाला नाहिसा, मध्य प्रदेशातील शिक्षकाचा दावा

या शिक्षकाला गेली 10 वर्षापासून पायाच्या तळव्याला खाज येणे आणि जळजळ होणे ही समस्या होती. बरेच उपचार घेऊनही त्याची ही समस्या बरी होत नव्हती. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर या शिक्षकाला आश्चर्यकारक अनुभव आला आहे. (The teacher has not been ill for 10 years due to vaccination in madhya pradesh)

लसीकरणामुळे 10 वर्षांपासूनचा आजार झाला नाहिसा, मध्य प्रदेशातील शिक्षकाचा दावा
लसीकरणामुळे शिक्षकाचा 10 वर्षांपासूनचा आजार झाला नाहिसा
Follow us
| Updated on: May 19, 2021 | 9:10 PM

मध्य प्रदेश : कोरोना लसीबाबत सर्वत्र विविध प्रतिक्रिया उमटत आहे. कारण या लसीबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. प्रत्येक व्यक्तीबाबतीत या लसीचे वेगळे परिणाम आहेत. काहींना ही लस घेतल्यानंतर त्रास होतो, काही लस घेतल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह येतात. तर काहींना बिलकुल त्रास होत नाही. मात्र मध्य प्रदेशातील बडवानी येथील एका शिक्षकाचा या लसीचा अनुभव एकदम वेगळा आहे. कोरोना लस घेतल्यानंतर या शिक्षकाचा चक्क 10 वर्षे जुना आजार बरा झाला आहे. (In Madhya Pradesh, a teacher’s chronic illness was cured after being corona vaccinated)

10 वर्षापासून होता आजार

या शिक्षकाला गेली 10 वर्षापासून पायाच्या तळव्याला खाज येणे आणि जळजळ होणे ही समस्या होती. बरेच उपचार घेऊनही त्याची ही समस्या बरी होत नव्हती. मात्र कोरोना लस घेतल्यानंतर या शिक्षकाला आश्चर्यकारक अनुभव आला आहे. लस घेतल्यानंतर शिक्षकाचा हा आजाराचे एखादी जादू झाल्याप्रमाणे समूळ उच्चाटन झाले. काशिराम कनोजे असे या शिक्षकाचे नाव असून ते येथील कुंजरी गावात राहतात. भंवरगढ येथील माध्यमिक विद्यालयात काशिराम शिक्षक आहेत. काशिराम यांना दहा वर्षांपूर्वी हा आजार झाला. त्यांनी अनेक डॉक्टारांकडे याबाबत इलाज केला, अनेक रुग्णालयाच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र त्यांच्या आजार बराच होत नव्हता.

लसीकरणामुळे आजाराल मिळाला पूर्णविराम

काशिराम यांची परिस्थिती इतकी बिकट होती की, त्यांना विश्रांतीही घेता येत नव्हती. खुर्चीवर पाय खाली सोडून बसता येत नव्हते. तळव्यांमध्ये इतकी जळजळ व्हायची की बसताही येत नव्हते की झोपता येत नव्हते. शाळेत देखील खुर्चीवर पाय ठेवून बसावे लागे. गेली दहा वर्षे सुरु असलेला हा त्रास अखेर कोरोना लसीने नष्ट केला. कोरोना लस घेतल्यानंतर 5 दिवसांनी काशिराम यांना खाज व जळजळ या समस्येपासून आराम येऊ लागला आणि आता तो पूर्ण बरा झाला आहे, असा दावा काशिराम यांनी केला आहे.

11 एप्रिल रोजी घेतला होता पहिला डोस

काशिराम यांनी 11 एप्रिल रोजी जमानिया उप आरोग्य केंद्रात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला, त्यानंतर 5 दिवसानंतर त्यांना तळव्याची जळजळ कमी झाल्याचे जाणवू लागले. हळूहळू जळजळपासून संपूर्ण आराम मिळाला. त्यांचे म्हणणे आहे की, लसीकरणामुळे हे शक्य झाले आहे आणि आता त्यांना कोणतीही अडचण नाही. आता ते आरामात झोपू शकतात आणि खुर्च्याखाली पाय ठेवून आरामात बसू शकतात. लसीकरणामुळेच आपला जुना आजार पूर्णपणे बरा झाल्याचे काशिराम म्हणाले. (In Madhya Pradesh, a teacher’s chronic illness was cured after being corona vaccinated)

इतर बातम्या

कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने, नागपूरच्या ‘NEERI’चं संशोधन, वेळ आणि खर्चाची बचत

अधिकाऱ्यांवर भरवसा नाही, नितीन राऊतांचा थेट कृषी मंत्र्यांना फोन; वीज पुरवठ्याची घेतली माहिती

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.