दोन वर्षात मीडिया हाऊसेस टीव्ही 9 चा कित्ता गिरवतील; पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून टीव्ही 9 चं कौतुक
टीव्ही 9 नेटवर्कने आयोजित केलेल्या दोन दिवसीय 'व्हॉट इंडिया थिंक्स टुडे' कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही नाईनच्या उपक्रमाचे कौतूक केले. आता टीव्ही नाईनने पायंडा पाडला आहे, इतर मीडिया हाऊसेस टीव्ही 9 चा कित्ता गिरवतील असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

टीव्ही 9 नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ या कार्यक्रमाची सुरुवातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाषणाने झाले. नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या भारत मंडपम येथे झालेल्या कार्यक्रमात तरुणाईने घेतलेल्या सहभागाबाबत कौतूक केले ते म्हणाले की २०४७ मध्ये जेव्हा विकसित भारताचे स्वप्न साकार होईल त्यावेळी ही पिढी त्यावेळी वयाच्या ज्या टप्प्यावर त्यांना भारताच्या प्रगतीसाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ पाहून समाधान वाटेल असे पंतप्रधान आपल्या छोटेखाणी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले.
ते पुढे म्हणाले की आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करत असते. आम्ही टॅक्स सिस्टीमला टॅक्स पेअर फ्रेंडली केले आहे. सीएच्या मदतीशिवाय आयटीआर भरता येत नव्हता. आता आपण ऑनलाईन आयटीआर फाईल करीत आहोत. लगेच काही दिवसात रिफंड येत आहे. गेल्या १०-११ वर्षात भारत प्रत्येक सेक्टरमध्ये बदलला गेला आहे. विचारांचा बदल झाला आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने लोकांना विचार करायला भाग पाडल आहे. पूर्वी विदेशी वस्तूच मागितल्या जायच्या. आता ‘मेड इन इंडिया’ वस्तू खरेदी केल्या जात आहे. हा विचार बदलला असेही मोदी यावेळी म्हणाले.
तीन चार दिवसांपूर्वी एक बातमी आली की भारताने ‘एमआयआर’ मशीन तयार केली. इतक्या वर्षांपासून विदेशी एमआयआर मशीनच वापरली जायची. आता मेड इन इंडिया मशीन असेल तर वाद कमी होईल. मेक इंडिया आणि आत्मनिर्भर भारताने देशातील मॅन्युफॅक्चरींग सेक्टरला नवीन ऊर्जा दिली आहे. हे यश महत्त्वाचं आहे. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला त्याचं उदाहरण दिसेल असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.




टीव्ही ९ ने ही परंपरा तोडली
मोदी यांनी या उपक्रमाचे कौतूक करताना सांगितले की टीव्ही ९च्या या समिटमध्ये विस्ताराने चर्चा होईल. अनेक विषयावर मंथन होईल. आपण जो काही विचार करू तो आपल्या उद्याच्या भविष्याला डिझाईन करेल. गेल्या दशकात भारताने स्वातंत्र्यासह नवीन प्रवास सुरू केला होता. आता या दशकात आपण विकसित भारताच्या दिशेने जात आहोत. २०४७ पर्यंत आपल्या विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. मी लालकिल्ल्यावरून सांगितलं सर्वांचा प्रयत्न यात आवश्यक आहे. टीव्ही ९ ने या कार्यक्रमाचं आयोजन करून एक सकारात्मक पुढाकार घेतला आहे. सर्वांना या समिटच्या यशस्वीतेसाठी माझ्या शुभेच्छा. मी टीव्ही ९चे अभिनंदन करतो. पूर्वीही मीडिया हाऊसने समिट केलं आहे. पण फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये समीट व्हायची. बोलणारे, ऐकणारे आणि रूमही तेच. पण टीव्ही ९ ने ही परंपरा तोडली. टीव्ही ९ ने नवीन मॉडेल तयार केले आहे. दोन वर्षात सर्व मीडिया हाऊसला तेच करावं लागेल असेही मोदी यावेळी म्हणाले.
हे अद्भूत काम आहे
टीव्ही ९ ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ने, बाकींसाठी रस्ता उघडा करून देईल. मी या प्रयत्नासाठी सर्वांचं अभिनंदन करतो. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा ईव्हेंट मीडिया हाऊसच्या भल्यासाठी नाही तर देशाच्या भल्यासाठी रचना केली. ५० हजाराहून अधिक तरुणांसोबत मिशन मोडमध्ये चर्चा करणे, त्यांना मिशनशी जोडणे, जी मुले सिलेक्ट झाली. त्यांचं ट्रेनिंग करणं हे मोठं काम केलं. हे अद्भूत काम आहे. मलाही तरुण आणि हुशार मुलांसोबत फोटो काढायला मिळालं. हे माझं सौभाग्य आहे. तुमच्यासोबत फोटो काढावा लागला हे सौभाग्य आहे. सर्व युवा पिढी २०४७ मध्ये जेव्हा देश विकसित भारत बनेल तेव्हा सर्वाधिक फायदा तुम्हाला मिळेल. कारण तुम्ही वयाच्या एका टप्प्यावर असेल. जेव्हा भारत विकसित होईल तुमच्यासाठी मौजच मौज असेल असेही मोदी यावेळी म्हणाले.