Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन-तीन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता

येत्या ७२ तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदं दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

दोन-तीन दिवसांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार?, महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदं मिळण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Jul 08, 2023 | 5:38 PM

नवी दिल्ली : राज्यात शिंदे गट भाजपसोबत आला. त्यानंतर शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले. त्याला एक वर्ष झालं. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाला. शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप यांचे राज्यात सरकार आहे. यापैकी शिंदे आणि अजित पवार गटाच्या नेत्यांपैकी दोन जणांना केंद्रात स्थान मिळण्याची शक्यता आले. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यात कोणाला स्थान मिळते, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सोमवारी किंवा मंगळवारी होणार विस्तार

येत्या ७२ तासांत केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला दोन मंत्रीपदं दिली जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शिंदे गटाला एक मंत्रीपद तर, अजित पवार गटाला एक मंत्रीपद दिलं जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सोमवारी किंवा मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.

अजित पवार गटाला मंत्रिपद मिळणार

२० तारखेपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यापूर्वी हा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. पुढच्या ७२ तासांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो, अशी खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे. अजित पवार गटाला एक आणि शिंदे गटाला एक मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

दोन मंत्र्यांना राजीनामा देण्याचे आदेश

सध्या महाराष्ट्राच्या वाट्याला एक कॅबिनेट आणि चार राज्यमंत्रीपदं आहेत. या चारपैकी दोन मंत्र्यांना मंत्रिपदं गमवावी लागणार आहेत. ते कोण आहेत, ते अद्याप स्पष्ट झालं नाही. परंतु, या दोघांना राजीनामा देण्याचे आदेश वरिष्ठ पातळीवरून देण्यात आल्याची माहिती आहे.

अनेक दिवसांपासून हा केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार रखडला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवार काँग्रेसमध्ये गेलेत. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तार होतोय. त्यामुळे आता मंत्रिपद गमवावं लागणारी दोन नाव कोणती. शिवाय कोणत्या दोन खासदारांना मंत्रीपदं मिळणार, हे येत्या ७२ तासांत स्पष्ट होणार आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.