शिवपुरी – ब्राह्मणांवर बहिष्कार (Boycott Brahmins)घालण्याचा निर्णय शिवपुरी या जिल्ह्यात घेण्यात आला आहे. मध्य प्रदेशात (Shivpuri, MP)हे लोण आणखीही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. लोधी समाजाने ब्राह्मणांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. हे सगळे करण्याचे कारणही राजकीय आहे. लोधी समाजाचे मोठे नेते प्रीतम लोधी (Pritam Lodhi)यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वक्तव्य केले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यात ब्राह्मणांना विरोध सहन करावा लागत होता. ब्राह्मणांना खूश करण्यासाठी भाजपाने प्रीतम लोधी यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर ओबीसी समाजाने मध्य प्रदेशात भाजपाच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. याच काळात प्रीतम लोथी यांच्या विरोधात काही पूजा करणारे, कथाकार, कीर्तनकारही बोलण्यास सुरुवात झाली. हे भाजपाचे समर्थक मानले जातात. आता ही लढाई दोन जातींवर येऊन ठेपली आहे. यात अडचण झाली आहे ती भारतीय जनतचा पार्टीची.
नवभारत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशातील लोधी समाजाने असा निर्णय घेतला आहे की, घरात करणाऱ्यात येणाऱ्या पूजा किंवा कर्मकांडांसाठी ब्राह्मणांना बोलावणार नाही. त्याचबरोबर काही ग्रामपंचायतींनीही हा निर्णय घेतला आहे की, जर कुणी घरी पूजेसाठी ब्राह्मणाला बोलावले तर त्याच्यावर पाच हजारांचा दंड आकारण्यात येईल. शिवपुरी जिल्ह्यात अनेक गावात अशी पत्रके वाटण्यात आली आहेत. या पत्रकावर लोधी समाजाती अनेकांनी स्वाक्षऱ्याही केलेल्या आहेत.
OBC Hindus have boycotted Brahmin Pujaris from inviting in Katha, Marriages and all other rituals. Also, issues a warning for those who break the Panchnama. 2100 Rs fine will be imposed on offenders. Also, this meeting happened in a temple of Ganeshkheda Village, MP. pic.twitter.com/L0cxbWKeqZ
— Shubham Sharma (@Shubham_fd) August 28, 2022
सोशल मीडियावर हे पत्र व्हायरल होते आहे. त्याच्यावरील तारीख जुनी आहे. मात्र या पत्रावरुन २३ ऑगस्ट रोजी काही गावांमध्ये असा निर्णय घेण्यात आला आहे. एका गावातील निर्णयात असे लिहिण्यात आले आहे की, सिद्धबाबा मंदिराच्या परिसरात लोधी समाजातील सगळे जण एकत्र जमा झाले होते. त्यावेळी असा निर्णय घेण्यात आला आहे की, यापुढे किर्तन, लग्न, वाद किंवा होमहवनासाठी ब्राह्मणांना बोलावण्यात येणार नाही. जर कुणी ब्राह्मणाला घरात पूजेसाठी बोलावले तर त्याच्यावर 5100 रुपयांचा दंड आकारण्यात येईल. जर कुणी या निर्णयाचे उल्लंघन केले तर त्याला समाजातून बाहेर काढण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
अशाच प्रकारचा नि्णय लोधी समाजाचे बहुमत असलेल्या अनेक गावांमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे. हा निर्णय झाल्यानंतर याचा पंचांसमोर पंचनामाही तयार करण्यात आला आहे. हा निर्णय गावांमध्ये वाटण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी भिंड जिल्ह्यात प्रीतमसिंह यांच्या नेतृत्वात एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यात पोलिसांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. आता बहिष्कारानंतर हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
2023 साली मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. प्रीतम लोधी यांना भाजपातून काढण्यात आल्यानंतर हा वाद वाढलेला दिसतो आहे. वाद वाढल्यानंतर भाजपा बॅकफूटवर गेल्याचे मानण्यात येते आहे. 2023 पूर्वी कोणतीही जोखीम उचलण्याची पक्षाची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे. दोन्ही जातींना सांभाळण्याचे काम सध्या सुरु करण्यात आले आहे. उमा भारतीय याच लोधी समाजातून येतात. पक्षाला हा वाद तातडीने मिटवायचा आहे. या दोन्ही जातीचे मतदार हे भाजपाचे आहेत. प्रीतम लोधी यांच्यवर कारवाई झाल्यानंतर पक्षातूनही विरोध झाला आहे.