चेन्नई : इनकम टॅक्स विभागाने (प्राप्तिकर विभाग) दक्षिण भारतातील सर्वात मोठ्या दागिन्यांचा व्यवसाय करणाऱ्या ‘सराफा परिसरात’ छापा टाकला ज्यातून 1 हजार कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न समोर आले आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने रविवारी (आज) ही माहिती दिली. मात्र कोणत्या व्यापार्यांच्या दुकानांवर हा छापा टाकला आहे, याची माहिती कर मंडळाने दिलेली नाही. (Income Tax Raids Chennai jewellery area)
आयकर विभागाचे हे छापे चेन्नई, मुंबई, कोयंबतूर, तिरुचिरापल्ली, त्रिसूर, नेल्लोर, जयपूर आणि इंदोरच्या 27 परिसरात 4 मार्च रोजी पडले. याच प्रकरणांचा तपास सध्या सुरु आहे.
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) दावा केला आहे की छापे दरम्यान अघोषित 1.2 कोटी रूपयांची रोकडही जप्त केली गेली आहे. सीबीडीटीने एक निवेदन जारी करुन दावा केला आहे की, सराफा व्यावसायिकांच्या आवारातून मिळालेल्या पुराव्यांवरून असे दिसून आले आहे की रोख विक्री, बनावट रोख पत, खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाच्या नावाखाली ‘डमी’ खात्यात रोकड जमा केली गेली.
सीबीडीटीच्या निवेदनात म्हटले आहे की, “नोटाबंदीच्या काळात रोख रक्कमही जमा करण्याबाबतही माहिती आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) कर विभागाचा प्रशासकीय अधिकार आहे. दागदागिने विक्रेत्याच्या बाबतीत असे दिसून आले की “करदात्याने स्थानिक फायनान्सरांकडून रोख कर्ज घेतले आणि परतफेड केली, बिल्डरांना रोख कर्ज दिले आणि रिअल इस्टेटमध्ये रोख रक्कम गुंतवली.”
संबंधित व्यावसायिकांनी हिशेब न ठेवता सोने खरेदी केल्याचा दावाही बोर्डाने केला आहे. निवेदनात म्हटले आहे की, “छापेमारीमध्ये आतापर्यंत एक हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे.”
(Income Tax Raids Chennai jewellery area)
हे ही वाचा :
Income Tax Raid | इन्कमटॅक्सची धाड दुसऱ्या दिवशीही सुरूच! तापसी-अनुरागवर आता ‘ED’ची टांगती तलवार