कोरोना काळात रेकॉर्ड ब्रेक कमाई करणाऱ्या डोलो-650 च्या कंपनी आणि मालकांवर इन्कम टॅक्सची धाड
कोरोना काळात डोलो-650 या गोळीची तुफान विक्री झाली. आता या गोळीची निर्माता कंपनी आणि मालकांच्या ठिकाण्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाच्या जवळपास 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने बंगळुरुच्या माइक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयावर छापे टाकले.
नवी दिल्ली : कोरोना काळात डोलो-650(Dolo-650) ही गोळी चांगलीच चर्चेत आली. कोरोना काळात या गोळीने विक्रीच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. डोलो-650 च्या कंपनी आणि मालकांवर इन्कम टॅक्सची(Income tax raids) धाड पडली आहे. कर चोरी प्रकरणी रही कारवाई करण्यात आल्याचे समजते.
कोरोना काळात डोलो-650 या गोळीची तुफान विक्री झाली. आता या गोळीची निर्माता कंपनी आणि मालकांच्या ठिकाण्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. आयकर विभागाच्या जवळपास 20 अधिकाऱ्यांच्या पथकाने बंगळुरुच्या माइक्रो लॅब्स लिमिटेडच्या कार्यालयावर छापे टाकले.
बुधवारी देशभरातील ४० ठिकाणी आयकर विभागाच्या २०० अधिकाऱ्यांनी छापे मारले आहेत. यामध्ये नवी दिल्ली, सिक्कीम, पंजाब, तामिळनाडू आणि गोवा येथील कार्यालयांचा देखील समावेश आहे. मायक्रो लॅब्सचे मालक सीएमडी दिलीप सुराना आणि संचालक आनंद सुराना यांच्या घरांवरही इन्कम टॅक्सने धाडी टाकल्या आहेत.
बंगळुरूच्या माधवनगरमध्ये रेसकोर्स रोडवर कंपनीचे ऑफिस आहे. छापेमारीवेळी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे तपासली आहेत. कर चोरी केल्याचा इन्कम टॅक्सला संशय आहे. या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे.
डोलो गोळीच्या विक्रीच्या माध्यमातून कंपनीने कोरोना महामारीमध्ये मोठा नफा कमावला होता. कोरोना महामारीत म्हणजेच 2020 मध्ये डोलो गोळीच्या विक्रीच्या माध्यमातून 350 कोटी रुपयांची कमाई केली.
डोलो कंपनीने सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांना मागे टाकत 400 कोटींचा महसूल गोळा केला आहे. डोलोने कोरोना काळात एवढी विक्री केली की सर्व रेकॉ़र्ड मोडून टाकले होते.