UP : गावात आलेल्या फकीरांकडे मागितले आधारकार्ड, द्यायला लावल्या श्री रामाच्या घोषणा; कान पकडून काढायला लावल्या उठाबशा
तीन फकिरांना चौकशी करून त्यांसोबत केलेल्या अभद्र कृती करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे, की स्वत: मनाने केलं आहे, याची पोलिस तपासणी करीत आहेत.
मुंबई – उत्तर प्रदेशमध्ये (UP) गोंडामधील (Gonda) डिगूर गावातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये 3 मुस्लिम गावात जातात. यादरम्यान तिघांच्याबाबत एका तरूणाकडून असभ्य वर्तन केले आहे. या मुलाने तीन मुस्लिमांचे कान पकडून त्यांना उठाबशा काढायला लावल्या आहेत. त्यानंतर श्री रामाच्या घोषणा देखील मोठ्याने द्यायला सांगितल्या. परगावातील असलेल्या तीन मुस्लीम फकीरांनी आदेशाचं पालन केलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्याकडे आधारकार्ड देखील मागितलं असल्याची माहिती समजली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर संबंधित तीन फकीरांनी थेट पोलिस (police) स्टेशन गाठलं आहे. त्यानंतर त्यांनी त्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिस नेमकी काय कारवाई करणार याकडे त्या फकिरांचे लक्ष लागले आहे. खरगपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे.
पोलिसांनी आरोपीला घेतलं ताब्यात
तीन फकिरांना चौकशी करून त्यांसोबत केलेल्या अभद्र कृती करणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच हे कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे, की स्वत: मनाने केलं आहे, याची पोलिस तपासणी करीत आहेत. तसेच याच्या आगोदर आरोपीकडून अशा पद्धतीचं कोणतं कृत्य केलं आहे का ? याची देखील चौकशी करण्यात येणार आहे. तरूणाने हे सगळं करताना व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे तरूणावरती कठोर करवाई होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. सीओ सिटीने दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एकाला विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. हे तिघे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्या गावत गेले होते, याचाही तपास सुरू आहे.
असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात
देशात अनेकदा असे व्हिडीओ व्हायरल होतात. त्यानंतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. आत्तापर्यंत देशात असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये एखाद्या इसमाला मारहाण करणे, एखाद्या इसमाची छेद करणे, काही विनोदी व्हिडीओ असतात. तर काही न पाहण्यासारखे व्हिडीओ असतात.
युपीत झालेलं प्रकरण एकदम गंभीर स्वरूपाचं आहे. त्यामुळे पोलिस चौकशी केल्यानंतर काय कारवाई करतात हे पाहावं लागेल.