Independence Day: स्वातंत्र्यवीरांना नमन ते घराणेशाहीवर टीका, विकसीत भारत ते स्वदेशीचा संकल्प, वाचा नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले 10 मोठे मुद्दे

देश ब्रिटीशांच्या अंमलाखाली होता त्यावेळी मोठ मोठे संकल्प झाल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशातील सोयीसुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. देशातील प्रत्येक भाषेला महत्व असून भाषेमुळे प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे.

Independence Day: स्वातंत्र्यवीरांना नमन ते घराणेशाहीवर टीका, विकसीत भारत ते स्वदेशीचा संकल्प, वाचा नरेंद्र मोदी यांच्या भाषणातले 10 मोठे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 10:53 AM

नवी दिल्लीः देशात आज 75वा स्वातंत्र्यदिन ( 75वा स्वातंत्र्यदिन ) साजरा होत आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत दिल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांनी देशातील जनतेला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत आझादी का अमृत महोत्सव साजरा करण्याचं आवाहन केले. लाल किल्ल्यावरुन (Lal killa) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतीवीरांना सलामी देत सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, तंत्रज्ञान आणि विकासाच्या मुद्यावर जोर देत भारत सक्षम कसा होईल, त्यासाठी प्रत्येक क्षेत्रातून देशाच्या विकासासाठी कसा प्रयत्न केला जाईल याविषयीही संबोधित केले. यावेळी त्यांनी राजकारणावर बोलताना घराणेशाहीवरही टिपणी केली. घराणेशाही संपणार नाही तोपर्यंत देशातील चांगली माणसं, त्यांचे कौशल्य आणि त्यांचे ज्ञान समोर येणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

1 पाच संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त देशाला संबोधित करताना पाच संकल्प सांगितले. भारत आता मोठे संकल्प घेऊन वाटचाल करत असून त्यामधीलही मोठा संकल्प हा आहे की, विकसित भारताचा संकल्प हा महत्वाचा असल्याचेही त्यांनी सांगितले. तर दुसरा संकल्प सांगत असतान ते म्हणाले की, देशातील कोणत्या भागात, प्रदेशात गुलामीचा एक अंशही शिल्लक राहणार नाही, आणि त्यापासून, त्या गुलामीपासून आपण मुक्ती मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तर देशाला मिळालेला वारसा हा प्रत्येक भारतीयासाठी गर्व करण्यासारखाच आहे. तर देशातील एकताही महत्वाची असून नागरिकांनी आपली कर्तव्य पार पाडणेही गरेजची असल्याचे त्यांनी सांगितले.

2 स्वातंत्र्यवीरांना नमन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना अभिवादन करताना मंगल पांडे, तात्या टोपे, भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, चंद्रशेखर आजाद, अशफाकउल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल या क्रांतिवीरांना त्यांनी नमन केले.

3 घराणेशाहीवर टीका

देशातील घराणेशाहीवर बोलताना त्यांनी सांगितले की हा राजकारणाचा विषय नाही मात्र देशातील राजकीय घराणेशाहीमुळे देशाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक तज्ज्ञ, चांगली आणि हुशार लोकं यामुळे दुर्लक्षित राहिले असल्याचेही त्यांनी सांगितले. घराणेशाही नाकारुन ज्यावेळी देशासाठी काम केले जाईल त्यावेळी देशाचा विकास आणि वाटचाल यशस्वी होणार आहे.

4 आत्मनिर्भर भारताचा नारा

आत्मनिर्भर भारत, ही भारतातील प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची आणि समाजाच्या प्रत्येक घटकाची जबाबदारी आहे. स्वावलंबी भारत, हा सरकारचा अजेंडा नाही किंवा तो सरकारी कार्यक्रमही नाही. त्यामुळे हे समाजाचे जनआंदोलन असून ते आपण सगळ्यांनी पुढे घेऊन गेले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

5 केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामगिरीवर मोठं विधान

भारतात भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराविरुद्धही कोणत्याही परिस्थितीत आपल्याला लढा द्यावा लागणार असल्याचे सांगितले. बँक दरोडेखोरांची मालमत्ता जप्त केली जात असतानाच देशासमोरील दोन मोठी आव्हाने असल्याचे सांगित त्यांनी भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर टीका केली.

6 सेंद्रीय शेतीवर भर

देशाला स्वातंत्र्य मिळून अमृत महोत्सव साजरा होत असतानाच देशातील कृषी विभागाचा, शेतीचा विचार करणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या काळात आपल्या भारतातील सगळ्यांनी सेंद्रीय शेतीवर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

7 डिजिटील भारत

आज भारताने डिजिटीलच्या क्षेत्रात विकसित होत असतानाच त्यांनी सांगितले की, देशाची 5G च्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आज 75 वर्षांनंतर मेड इन इंडिया बंदुकीनेच देशाला सलामी देण्यात येत आहे. डिजिटल क्रांतीमुळे एक नवीन जग निर्माण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

8 जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि आता जय अनुसंधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान यामध्ये खरी नवनिर्मिती आहे. त्यामुळे देशातील विकासाला खरी चालना मिळत आहे. आज देश 5G च्या दिशेने वाटचाल करत आहे. ज्यावेळी आरोग्य सेवेचा संदर्भ येतो त्यावेळी जगातील अनेक देश भारतातील योग आणि आयुर्वेदाचा संदर्भ घेतात, हाच खरा भारताचा वारसा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

9 महिला सबलीकरण

लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक महिलेचा सन्मान गौरव होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचा अपमान करणे योग्य नाही, मात्र आपल्या देशात महिलांचा नेहमीच गौरव केला जात आहे. देशातील महिलावर्गाच्या गौरवामध्येच देशाचा खरा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगा आणि मुलगी यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

10 25 वर्षांची डेडलाईन

देश ब्रिटीशांच्या अंमलाखाली होता त्यावेळी मोठ मोठे संकल्प झाल्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. देशातील सोयीसुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचत आहेत. देशातील प्रत्येक भाषेला महत्व असून भाषेमुळे प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात विकासाचे नवे मार्ग आहेत, त्यामुळे भारताला पुढील 25 वर्षे ही भारताची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी महत्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.