Independence Day: स्वातंत्र्यांची पंचाहत्तरी लतादिदींच्या सुरेल सुरांविना अधुरीच, पाहा काही नवी , काही जुनी देशभक्तीपर टॉप 10 गाणी…
देशभक्तीने ओतप्रोत गाणी, काही जुनी काही नवी... ऐका...
मुंबई : आज देश स्वातंत्र्याची (Independence Day) पंचाहत्तरी साजरी करत आहे. ‘आझादी का अमृत महोत्सव’ (Azadi Ka Amtrut Mahotsav) देशभर साजरा होत आहे. हर घर तिरंगा हा उपक्रम केंद्र सरकारच्या वतीने राबवण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभरात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने सरकारतर्फे ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस सर्वांना आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केले आहे. अश्यात देसभक्तीपर गाण्यांशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा केलाच जाऊ शकत नाही. देशाच्या अफाट सौंदर्याच, स्वातंत्र्य आणि देशभक्तीच्या भावनेचं अप्रतिम वर्णन करणारी ही गाणी आपण ऐकायलाच हवीत! अशीच 10 देशभक्तीपर गीतं…