नवी दिल्ली | 29 सप्टेंबर 2023 : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो (Canada PM Justin Trudeau) यांच्या मानगुटीवर बसलेले भारतविरोधी भूत सध्या तरी उतरलेले दिसत आहे. पाकिस्तान आणि चीनच्या इशाऱ्यावर कॅनडात खलिस्तान चळवळीला धुमारे फुटले आहेत. त्याला पायबंद घालण्याचे सोडून ट्रूडो यांनी भारताला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. खलिस्तानी दहशतावादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Sing Nijjar) याची हत्या भारत सरकारनेच घडवून आणल्याचे सबळ कारणं आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला होता. पण गेल्या एका महिन्यात त्यांना भारतविरोधातील पुरावे काही सापडले नाही. आता सर्वच स्तरातून टीकेची झोड उठल्यावर त्यांचा नूर पालटला आणि सूर पण पालटला आहे. आता त्यांना भारताच्या ताकदीचा अंदाज आला आहे.
भारत तर एक आर्थिक ताकद
गुरुवारी कॅनडाच्या मॉन्ट्रियलमध्ये ट्रूडो यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘कॅनडा आणि त्याच्या मित्र देशांना भारताशी संबंध अधिक मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. जगातील अनेक मंचावर भारताला खास महत्व देण्यात येत आहे. भारत एक आर्थिक ताकद आहे. तसेच भूराजकीय दृष्टीने पण भारताची भूमिका महत्वाची आहे. हिंद महासागरात रणनीतीसाठी भारत अत्यंत महत्वाचा आहे. भारताशी मजबूत संबंधांसाठी आम्ही गंभीर आहोत.’ असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
‘अमेरिका आमच्या सोबत’
कॅनडचा नागरीक निज्जरची हत्या करण्यात आली. अमेरिका हे प्रकरण भारतासमोर ठरवेल. भारताच्या सहकाऱ्याने, मदतीने पुरावे समोर येतील. अमेरिकेन परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकेन हे प्रकरण भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्यासमोर ठेवतील. अमेरिका कॅनडाच्या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले.
काय आहे भारत-कॅनडा वाद
पंतप्रधान ट्रूडो यांच्या आरोपामुळे दोन्ही देशात कटूता आली होती. खलिस्तानचा दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याची कॅनडात 18 जून 2023 रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्येनंतर या सप्टेंबर महिन्यात तिथल्या संसदेत बोलताना ट्रूडो यांनी ही हत्या भारताने घडविल्याची खात्रीलायक कारणं समोर आल्याचा गंभीर आरोप केला होता. पण याविषयीचे पुरावे त्यांनी सादर केलेले नाहीत. कॅनडाने भारतीय राजदूताला माघारी परतण्याचे आदेश दिले होते. भारताने पण त्याला जशाच तशे उत्तर दिले. इतकेच नाही तर अनेक स्तरावर भारताने कॅनडाशी संबंध बंद केले. भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या भूमिकेत नरमाई आलेली दिसते.