China: कायम कुरापती करणाऱ्या चीनला भारताचा जबरदस्त झटका! 726 जणांचा व्हिसा केले रद्द, 117 चीनी नागरिकांना देशाबाहेर काढले

भारताने 2019-21 या तीन वर्षांमध्ये चीनच्या एकूण 726 नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. या सर्वांची एक यादीच सरकारने तयार केली आहे. या यादीत समाविष्ट असलेले लोक भारतात येऊ शकत नाहीत. इतकेच नाहीतर याच काळात भारतातून 117 चिनी लोकांना परत पाठवण्यात आल्याचीही माहितीही देण्यात आली आहे.

China: कायम कुरापती करणाऱ्या चीनला भारताचा जबरदस्त झटका! 726 जणांचा व्हिसा केले रद्द, 117 चीनी नागरिकांना देशाबाहेर काढले
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 10:41 PM

दिल्ली : कायम कुरापती करणाऱ्या चीनला भारताचा(India) जबरदस्त झटका दिला आहे. तब्बल 726 चीनी नागरीकांचा(Chinese nationals) व्हिसा(VISA) भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs of India)नाकारला आहे. तर, रद्द, 117 चीनी नागरिकांना देशाबाहेर काढले आहे. हे सर्व व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करत बेकायदेशीरपणे भारतात राहत होते. भारतात अवैद्यपणे राहणाऱ्या आणि घुसखोरी करणाऱ्यांवर सुरक्षा मंत्रालयाची विशेष नजर आहे. बेकायदीशर पणे वास्तव्यास असेलल्या परदेशी नागरीकांची यादी तयार करण्यात आली. या यादीत चीनी नागरीकांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.

चीनच्या कुरापतींमुळे पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सतत तणाव आहे. मात्र, भारताने चीनला चांगलाच धडा शिकवला आहे.  लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात केंद्र सरकारने भारतात अवैद्यपणे राहणाऱ्या परदेशी नागरीकांची माहिती दिली.

भारताने 2019-21 या तीन वर्षांमध्ये चीनच्या एकूण 726 नागरिकांचा व्हिसा रद्द केला आहे. या सर्वांची एक यादीच सरकारने तयार केली आहे. या यादीत समाविष्ट असलेले लोक भारतात येऊ शकत नाहीत. इतकेच नाहीतर याच काळात भारतातून 117 चिनी लोकांना परत पाठवण्यात आल्याचीही माहितीही देण्यात आली आहे.

केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. चीनी नागरिकांना व्हिसाच्या अटींचे उल्लंघन आणि इतर बेकायदेशीर पणे वास्तव्यास असल्या प्रकरणी यांना या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आले आहे.

81 चिनी नागरिकांना भारत सोडण्याची नोटिस

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 81 चिनी नागरिकांनी भारत सोडण्याची नोटीस बजावण्यात आल्याची माहिती देखील राय यांनी दिली.

कसे आले हे चीनी नागरीक भारतात?

भारतात अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या नागरीकांवर सरकार वॉच ठेवते. यामध्ये चिनी नागरिकांचा देखील समावेश आहे. जे वैध कागदापत्रांसह देशात प्रवेश करतात. नोकरी, पर्यटन किंवा इतर काही कामसाठी हे नागरिक भारतात येतात. यातील बहुतांश नागरिक हे व्हिसा नियमांचे आणि इतर बेकायदेशीर कृत्यांचे उल्लंघन करत असल्याचे आढळून आले. त्यांना आधी नोटीस दिली जाते आणि त्यानंतर त्यांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या इतर लोकांवर सरकार सातत्याने कारवाई करत आहे.

तैवानवरील हल्ल्याच्या प्रयत्नामुळे चीन चर्चेत

तैवानवरील हल्ल्याच्या प्रयत्नामुळे चीन सध्या चांगलाच चर्चेत आहे.  अमेरिकन संसदेच्या अध्यक्ष नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चीन आणि अमेरिका पुन्हा नव्याने आमनेसामने आले असून त्यांच्यातील वाद आता टोकाला गेला आहे. चीनने तैवानला चोहोबाजूने घेरण्याचा प्रयत्न केला असून तैवानच्या चारही बाजूंनी नो एन्ट्री झोन घोषित केला असून जलमार्ग आणि हवाईमार्गांना बंदी घातली असून त्यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.