India-China Face Off | भारताकडे सुखोई, अपाचे बोईंग, तर चीनकडे चेंगडू जे-20 आणि wz-10, कुणाकडे किती शस्त्रसाठा?
चीनच्या सैन्याचं बजेट हे भारताहून अनेक पटीने जास्त असले, तरी सैन्यसंख्येत भारत चीनहून पुढे आहे.
India-China Face Off : नवी दिल्ली : भारत-चीन सैन्यात गलवान खोऱ्यात झालेल्या (India-China Face Off) संघर्षात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर, या संघर्षात भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तरात चीनचे देखील 35-40 सैनिक मारले गेल्याचं वृत्त अनेक माध्यम संस्थांनी दिलं आहे. मात्र, अद्याप याचा अधिकृत आकडा चीनकडून जाहीर करण्यात आलेला नाही. या संघर्षामुळे भारत-चीन सीमेवर सध्या तणावाचं वातावरण आहे. या परिस्थितीत जर भारत-चीन युद्ध झालं तर भारत आणि चीन यांच्यापैकी कोण वरचढ ठरेल? कुणाकडे किती सैन्य, किती शस्त्रसाठा आहे? (India-China Face Off) याचा हा आढावा.
चीनच्या सैन्याचं बजेट हे भारताहून अनेक पटीने जास्त असले, तरी सैन्यसंख्येत भारत चीनहून पुढे आहे. अनेक फ्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध माहितीनुसार, भारताकडे 34 लाख 62 हजार 500 जवान आहेत. तर चीनमधल्या जवानांची संख्या 26 लाख 93 हजारांच्या घरात आहे. भारताकडे 694 अत्याधुनिक लढाऊ विमानं आहेत. तर चीनकडे लढाऊ विमानांची संख्या 1564 आहे. भारतीय लष्कराकडे 4,184 टँक आहेत. तर चीनी लष्कराकडे 13,050 टँक आहेत. भारतीय वायुदलाकडे 612 हेलिकॉप्टर आहेत. तर चीनकडे हाच आकडा 1, 004 इतका आहे.
भारताकडे सामानवाहू विमानांची संख्या 2082 आहे. तर चीनकडे एकूण सामानवाहू विमानं 3,187 आहेत. भारताकडे समुद्रात पहारा देणाऱ्या एकूण 16 पाणबुड्या आहेत. तर चीनकडे जुन्या आणि नव्या अशा एकूण पाणबुड्यांची संख्या 76 इतकी आहे. भारतीय सैन्याचं एकूण बजेट 55.2 अब्ज डॉलर, तर चीनचं एकूण बजेट 224 अब्ज डॉलर आहे.
भारत-चीन अत्याधुनिक शस्रांची तुलना
सुखोई SU-30 MKI हे भारतीय वायुदलातलं आणि जगातल्या सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक आहे. दोन इंजिन असलेलं सुखोई रशियन बनावटीचं आहे. मात्र, ते भारतीय भुभाग आणि भारतीय वायुदलाच्या गरजा लक्षात ठेवून खास पद्धतीनं बनवलं गेलं आहे. सध्या लायनन्सनुसार, सुखोईची भारताच्या एचएलमध्ये निर्मिती केली जाते. सुखोई मूळ रशियन असलं तरी त्याचा सध्याच्या अॅडव्हॉन्स वर्जनचा 50 टक्के भाग हा पूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे.
चेंगडू जे-20 हे चीनच्या वायुदलाचं सर्वात शक्तिशाली विमान आहे. या विमानाला कोणतंच रडार पकडू शकत नसल्याचा दावा चीन करत आला आहे. चेंगडू एअरवेज या कंपनीनं हे विमान बनवलं. हीच कंपनी चीन सरकारच्या शस्र कंपनीची भागीदार कंपनी आहे. 2016 मध्ये चीननं पहिल्यांदा हे विमान एका प्रात्यक्षिकाद्वारे सादर केलं होतं. मात्र 2016 च्या आधीपर्यंत सुद्धा बऱ्याच प्रमाणात विमानांच्या बाबतीत रशियावर अवलंबून होता.
अपाचे बोईंग AH-64E हे सध्या भारतीय वायुदलातलं सर्वात आधुनिक हेलिकॉप्टर मानलं जातं. आधी एमआय कंपनीचे हेलिकॉप्टर मोठ्या संख्येनं भारतीय वायुसेनेत होते. मात्र, त्यानंतर भारतीय वायुदलात सामील झालेलं अपाचे बोईंग हे जगातलं आधुनिक हेलिकॉप्टर आहे. विपरीत हवामानातही हे हेलिकॉप्टर प्रति मिनिटाला 3 किलोमीटर वेगानं धावू शकतं. आणि हल्ला करण्याची क्षमताही मोठी आहे (India-China Face Off).
wz-10 हे चीनच्या वायुदलातलं आधुनिक हेलिकॉप्टर आहे. या हेलिकॉप्टर डिझाईन रशियनं कंपनीनं बनवलं. मात्र, त्याचं उत्पादन चीनच्या चँगी एअरक्राफ्ट कंपनीनं केलं. या हेलिकॉप्टरची पहिली चाचणी 2003 मध्ये झाली होती आणि 2012 मध्ये सैन्यात सहभागी केलं गेलं. या हेलिकॉप्टरमध्ये हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवरही मारा करण्याची क्षमता आहे.
रणगाडा भारतीय सैन्याच्या ताफ्यातलं सर्वात विश्वासू हत्या मानलं जातं. टँकच्या जोरावर भारतानं अनेक युद्धं जिंकली आहेत. सध्या टी-90 s भीष्म हे जगातल्या सर्वात खतरनाक शस्रांमध्ये गणलं जातं. चौफेर मारा करण्यासाठी टी-90 भीष्ण 360 च्या अँगलनं वर्तुळाकार फिरु शकतो. अँटी एअरक्राफ्ट गन ही भीष्मचं शक्तीस्थळ आहे. अँटी एअरक्राप्ट गनमधून सुटलेली गोळी दोन किलोमीटरवर लांब असलेल्या एका हेलिकॉप्टरलाही जमीनदोस्त करु शकते. फक्त एका मिनिटात 800 गोळ्यांचा मारा करु शकतं. टार्गेट एकदा लॉक झालं आणि त्यानंतर जरी टँक वेगानं चालत असला तरी निशाणा अचूक असतो. भीष्ममध्ये एका मिनिटाला 7 राऊंड फायर करण्याची क्षमता आहे. भीष्मबरोबरच अर्जुन टँक हे भारताचं सर्वात हुकमी हत्यार मानलं जातं.
TYPE 99 हा चीनचा सर्वात शक्तिशाली रणगाडा आहे. याआधी चीन TYPE 88 टँकवर अवलंबून होता. TYPE 99 हे त्याचंच आधुनिक वर्जन आहे. 2001 मध्ये चीननं या टँकला आपल्या सैन्यात सामील केलं. भारताच्या भीष्मप्रमाणेच TYEP 99 सुद्धा एका मिनिटाला 7 राऊंड फायर करु शकतं. बनावट मजबूत असल्यामुळे मोठ्या हल्ल्यात सुद्धा TYPE 99 चं कमीत-कमी नुकसान होतं. TYPE 99 हा टँक चीनच्या सैन्याची शान मानला जातो.
1979 नंतर चीन एकही युद्ध लढलेला नाही
उपलब्ध माहितीच्या आधारावर शस्रसाठ्यात चीन भारताहून पुढे आहे. मात्र, 1979 नंतर चीन एकही युद्ध लढलेला नाही आणि त्याउलट भारतीय सैन्य रोज पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांना चोख उत्तर देतं. चीनचं शेवटचं युद्ध व्हिएतनामशी झालं होतं आणि शस्रसाठ्यात आणि आकारानं छोट्या असलेल्या व्हिएतमानकडून चीन पराभूत सुद्धा झाला होता. व्हिएतनामनं जगाची महासत्ता असलेल्या अमेरिकेलाही पळता भुई थोडं केल्याचा इतिहास आहे.
Col. Santosh Babu | एकुलत्या एक पुत्राने देशासाठी प्राणार्पण केल्याचा अभिमान, धीरोदात्त वीरमातेची प्रतिक्रिया https://t.co/VOqNjn1lrN #SantoshBabu #IndiaChinaFaceOff #GalwanValley #Ladakh
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2020
India-China Face Off
संबंधित बातम्या :
एका- एका जवानाला तिघांनी घेरले, तरीही भारतीय वीर भिडले, गलवान खोऱ्यातील थराराची इनसाईड स्टोरी