India-China | एकीकडे भीष्म टँक, दुसरीकडे आकाश मिसाईल सिस्टीम, भारतीय वायूदल अलर्ट मोडवर
भारतानं हजारो फुट उंचीवर भीष्म टँक तैनात केला. त्यानंतर आकाश मिसाईल सिस्टीम चिनी विमानांना कोणत्याही क्षणी टिपण्यासाठी सज्ज ठेवली.
मुंबई : आकाश असो की मग जमीन, भारतीय सैन्य डोळ्यात तेल (India-China Face Off) घालून सीमेवर पहारा देतं. भारतीय सैन्याची फक्त ही तयारीच चीनची झोप उडवण्यासाठी पुरेशी आहे. भारतानं हजारो फुट उंचीवर भीष्म टँक तैनात केला. त्यानंतर आकाश मिसाईल सिस्टीम चिनी विमानांना कोणत्याही क्षणी टिपण्यासाठी सज्ज ठेवली. तेव्हापासून चीन सैन्यांत चलबिचल सुरु झाली आहे (India-China Face Off).
चीननं जर पुन्हा आगळीक करण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण भारतीय वायूदल अलर्ट मोडवर आहे. चीन मिसाईल्सचा धाक दाखवून इतर देशांवर दादागिरी करत असला, तरी चीनच्या वायुदलाला लडाखमध्ये मर्यादा आहेत. सुखोई, मिग-29, मिराज ही भारतीय विमानं चीनला पळो की सळो करुन सोडण्याच्या क्षमतेची आहेत.
भारताची भूमिका स्पष्ट आहे. म्हणूनच सीमेवर सैन्यानं पूर्ण तयारी ठेवली. जर सीमेवर चीनकडून वार झाला, तर त्याचं उत्तर प्रतिवारानंच मिळणार. मात्र, गलवान घाटीत कुरघोडी करुन चीननं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली. कारण, आता माघार घेणं म्हणजे चीनसाठी पराभव पत्करण्यासारखंच आहे. दुसरीकडे, भारतीय सैन्य मागे हटणार नाही, हे सुद्धा चीनला कळून चुकलं आहे. कारण, 1962 च्या युद्धात चीननं भारताला गाफिल ठेऊन वार केला होता. तो अनुभव गाठिशी असल्यामुळे आता चीननं जरी टिचभर पाय हलवला, तरी त्याचं उत्तर व्याजासकट दिलं जाणार आहे.
एकीकडे 15 जूनला भारतीय सैन्यानं दिलेलं उत्तर आणि दुसरीकडे आता भारताची फुलप्रुफ तयारी. या दोन्ही गोष्टींमध्ये तिसऱ्या गोष्टीची भर म्हणजे चीनच्या सरकारला त्यांच्या सैन्यात बंड उफाळण्याची भीती वाटू लागलीय. दोन आठवडे उलटूनही चीननं मृत झालेल्या जवानांचा आकडा सांगितलेला नाही. जर तो आकडा सांगितला, तर चीनमध्ये सरकारविरोधातल्या असंतोषाच्या ठिणगीचा भडका उडण्याची शक्यता आहे (India-China Face Off).
चीनच्या एका बड्या कम्युनिस्ट नेत्याच्या मुलानंही चीनमध्ये बंडखोरीचं भाकित केलं आहे. जियानिल यांग यांचे वडील आधी कम्युनिस्ट पक्षात होते. मात्र, चीनमधल्या सध्याच्या परिस्थितीवर त्यांनी वॉशिंग्टन पोस्टमध्ये लिहिलेला एक लेख वास्तव मांडणारा आहे.
जर भारताच्या तुलनेत चीनचे जवान जास्त मृत झाल्याचं जाहीर केलं, तर तिथल्या सरकारच्या मनात जनतेमध्ये असंतोष उफाळण्याची भीती आहे.
15 जूननंतर चीनमध्ये मृत सैनिकांना गुपचूपपणे श्रद्धांजली दिली गेली. चीनी सैन्यामधल्या अनेक हालचालींवर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांचे रिपोर्ट समोर आले. मात्र, चिनी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं तरी सुद्धा जिनपिंग सरकारचा प्रोपेगेंडा थांबवला नाही. सैनिकांचा आकडा का दिला जात नाही, यावर ग्लोबल टाईम्सने अजब उत्तर दिलं.
भारतासोबत संघर्ष कमी करण्यासाठी चीन सरकार मृत सैनिकांचा आकडा सांगणार नाही. जर चीननं आकडा सांगितला, तर दोन्ही देशांमध्ये तुलना सुरु होईल आणि त्यानंतर युद्ध करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारवर दबाव येईल.
मात्र, भारताबरोबरच जगानंही चीन सरकारच्या डोळ्यावरचा हा भ्रमाचा चष्मा कधीच काढून ठेवला. म्हणून खोटं बोलताना सुद्धा ग्लोबल टाईम्स उघडं पडलं. जर भारताच्या तुलनेत चीनचे कमी जवान मेले असते, तर चीननं ती गोष्ट संपूर्ण जगाला ओरडून सांगितली असती. मात्र, 15 जूनच्या घटनेत चीनचे असंख्य जवान मारले गेल्याचं संपूर्ण जगाला माहित झालं आहे.
गलवान घाटीतल्या घटनेनंच जिनपिंग यांना खिंडीत गाठलं. कारण, जर मृत जवानांचा आकडा सांगितला तर जनतेमध्ये रोष निर्माण होण्याची भीती आहे आणि जर आकडा सांगितला नाही, तर चीनच्या माजी सैनिकांची नाराजी जिनपिंग यांना महागात पडू शकते. कारण, चीनमध्ये माजी सैनिकांची संख्या ही काही कोटींच्या घरात आहे. त्यामुळे त्यांची नाराजी ही सध्याच्या सैनिकांमध्ये बंडाची वात पेटवण्यासाठी पुरेशी आहे.
एकीकडे आड आणि दुसरीकडे विहीर. या कचाट्यात सापडलेल्या जिनपिंग यांच्याकडे सैन्य माघारी बोलावणं हाच एकमेव पर्याय आहे. मात्र, लडाखचा मुद्दा स्वतः चीननंच तुटेपर्यंत ताणल्यानं आता माघार घेणं सुद्धा चीनसाठी अवघड होऊन बसलं आहे (India-China Face Off).
भारतीय उद्योगपतीचा झटका, चीनला तब्बल 3000 कोटी रुपयांचा फटकाhttps://t.co/c122JGzi31#China #India #BoycottChina
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2020
संबंधित बातम्या :
इतिहास साक्षी आहे, विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय, पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा
Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात