Corona Update India : देशभरात 3 लाख 52 हजार नवे कोरोनाग्रस्त, 2800 अधिक रुग्णांचा बळी
भारतात आतापर्यंत 27 कोटी 93 लाख 21 हजार 177 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. (India Corona Case Update)
नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या 24 तासात देशात 3 लाख 52 हजार 991 नवे रुग्ण आढळले आहेत. तर दिवसभरात 2812 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्याभरातपासून देशात सातत्याने 3 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. जगातील इतर देशांपेक्षा भारतात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने सर्व ठिकाणी हाहाकार पाहायला मिळत आहे. (India Corona Case Update)
देशभरात आतापर्यंत 27 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या
भारतात एकीकडे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दुसरीकडे कोरोना चाचण्यांच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत तब्बल 27 कोटींहून अधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. ICMR ने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 27 कोटी 93 लाख 21 हजार 177 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यातील 14 लाख 02 हजार 367 कोरोना चाचण्या या काल (25 एप्रिल) एका दिवसात केल्या गेल्या आहेत.
27,93,21,177 samples tested for #COVID19 up to 25th April, 2021. Of these 14,02,367 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/W8dD2vDQ9s
— ANI (@ANI) April 26, 2021
देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढताच
नुकतंच केंद्रीय मंत्रालयाने देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, देशभरात गेल्या 24 तासात देशात 3 लाख 52 हजार 991 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी 73 लाख 13 हजार 163 इतकी झाली आहे. सध्या देशात 28 लाख 13 हजार 658 अॅक्टिव्ह कोरोनाबाधित (Active Case In India) आहेत.
तर दिवसभरात 2812 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात एकूण 1 लाख 95 हजार 123 कोरोनाबाधितांचा मृत्यू (Total Corona Death) झाला आहे. तसेच देशात गेल्या 24 तासात 2 लाख 19 हजार 272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या 1 कोटी 43 लाख 04 हजार 382 इतकी झाली (Total Corona Recoveries) आहे.
India reports 3,52,991 new #COVID19 cases, 2812 deaths and 2,19,272 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 1,73,13,163 Total recoveries: 1,43,04,382 Death toll: 1,95,123 Active cases: 28,13,658
Total vaccination: 14,19,11,223 pic.twitter.com/32V7eKf1UR
— ANI (@ANI) April 26, 2021
भारतात आतापर्यंत 14 कोटींहून अधिक लोकांना कोरोना लस
तर दुसरीकडे भारतात जगभरातील सर्वात मोठी कोरोना लसीकरण मोहीम सुरु आहे. रविवारी दिवसभरात 9 लाख 95 हजार 288 लोकांनी कोरोना लस घेतली आहे. त्यामुळे भारतात आतापर्यंत 14 कोटी 19 लाख 11 हजार 223 लोकांना कोरोना लस घेतली आहे. तर भारतात कोरोनाचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या 2 कोटी 26 लाख 45 हजार 437 इतकी झाली आहे. (India Corona Case Update)
संबंधित बातम्या :
मोदी सरकार कोरोना रोखायचा सोडून हेडलाईन मॅनेजमेंट करत बसलंय; निर्मला सीतारामन यांच्या पतीची चपराक