नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतातील कोरोना रुग्णांची संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे. मात्र कोरोनासाठी मे महिना घातक ठरला आहे. भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत गेल्या 21 दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे यंदाचा मे महिना देशासाठी धोकादायक ठरल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे गेल्या 21 दिवसात 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गेल्या महिन्यात 69.4 लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले आहेत. (India Corona patient May 70 lakh Cases crossed)
देशभरात मे महिन्यात 21 दिवसात 71 लाख 3 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. गेल्यावर्षी कोरोना रुग्णांमध्ये 27 टक्के रुग्णांची नोंद झाली होती. तर कोरोनाच्या दुसर्या लाटेत मे महिन्याच्या 21 दिवसांत 71 लाखांहून अधिक कोरोनाबाधित आढळले आहेत.
मे महिन्यात मृतांचा आकडाही गंभीर
गेल्या महिन्याभरातील कोरोनाबाधितांचा नव्हे तर मृतांचा आकडाही गंभीर आहे. देशभरातील मे महिन्यातील मृत्यूची आकडेवारी पाहिली तर आतापर्यंत 83 हजार 135 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. हा आकडा गेल्यावर्षाच्या मृत्यूदरापेक्षा 48 हजार 768 हून अधिक आहे. मे महिन्याच्या प्रत्येक दिवसात आतापर्यंत सरासरी 4,000 मृत्यू (3,959) नोंदविण्यात आले आहेत. मात्र या डेटामध्ये काही आधी झालेल्या मृत्यूचाही समावेश आहे. भारतात 14 मेपासून आतापर्यंत केवळ दोन वेळा मृत्यूची संख्या 4 हजारच्या खाली नोंदवण्यात आली आहे.
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 57 हजार 299 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 194 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 630 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. (India Corona patient May 70 lakh Cases crossed)
भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 62 लाख 89 हजार 290 वर गेला आहे. देशात 2 कोटी 30 लाख 70 हजार 365 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 95 हजार 525 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 29 लाख 23 हजार 400 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 33 लाख 72 हजार 819 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,57,299
देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,630
देशात 24 तासात मृत्यू – 4,194
एकूण रूग्ण – 2,62,89,290
एकूण डिस्चार्ज – 2,30,70,365
एकूण मृत्यू – 2,95,525
एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 29,23,400
आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,33,72,819
(India Corona patient May 70 lakh Cases crossed)
India reports 2,57,299 new #COVID19 cases, 3,57,630 discharges & 4,194 deaths in last 24 hrs, as per Health Ministry.
Total cases: 2,62,89,290
Total discharges: 2,30,70,365
Death toll: 2,95,525
Active cases: 29,23,400Total vaccination: 19,33,72,819 pic.twitter.com/NNm0bCEEdK
— ANI (@ANI) May 22, 2021
संबंधित बातम्या :
मी आधीच सांगितलं होतं, निवडणुका संपल्यावर मोदी चॅनेलवर येऊन रडतील; आप खासदाराचं ट्विट व्हायरल