India Corona Update : पंतप्रधान मोदींची उच्चस्तरीय बैठक संपली, कोरोनाला रोखण्यासाठी केंद्राचा पंचसूत्री कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला.
नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. विविध राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कोरोना लसीकरण अभियानाचा आढावा घेण्यात आला. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत अधिकाऱ्यांना काही निर्देश दिले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती आणि अभियानातील त्यांचा सहभाग हा महत्वाचा असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. (PM Narendra Modi’s 5 point program to prevent the spread of corona)
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांना 5 सूत्री कार्यक्रम समजावून सांगितला. टेस्टिंग, ट्रेसिंग, ट्रीटमेंट, कोरोना नियमांचं पालन आणि लसीकरण जर पूर्ण गंभीररित्या आणि कटीबद्धपणे राबवलं गेलं. तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत होईल, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय. त्यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृतीवर भर देण्याचे निर्देश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत.
Reviewed the COVID-19 and vaccination related situation across the country. Reiterated the importance of the five fold strategy of Testing, Tracing, Treatment, Covid-appropriate behaviour and Vaccination as an effective way to fight the global pandemic. https://t.co/WjOtjfCXm3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2021
6 ते 14 एप्रिल दरम्यान देशभरात विशेष मोहीम
कोरोनापासून बचावासाठी देशभरात 6 ते 14 एप्रिल दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यात 100 टक्के मास्कचा वापर, वैयक्तिक स्वच्छता आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता किती गरजेची आहे, याबाबत नागरिकांना माहिती दिली जाणार आहे.
Prime Minister @narendramodi chaired a high-level meeting to review #COVID19 situation and #vaccination program in the country.
PM highlighted the need to enforce COVID appropriate behaviour in the coming days.#StaySafe
Details: https://t.co/geWBi5Rly4 pic.twitter.com/C1JeV5U77R
— #IndiaFightsCorona (@COVIDNewsByMIB) April 4, 2021
महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कठोर निर्बंध लावण्यात येणार आहेत, तशी माहिती राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी दिलीय. राज्यात विकेंड लॉकडाऊन म्हणजे शनिवार आणि रविवार कडक लॉकडाऊन असणार आहे. राज्य सरकारने तयार केलेले नवे निर्बंध उद्यापासून लागू असतील, अशी माहिती मलिक यांनी दिलीय. (Mini lockdown announced in Maharashtra, what started in the state, what will be closed?)
राज्यात काय सुरु, काय बंद?
> > उद्यापासून रात्री 8 ते सकाळी ७ पर्यंत रात्रीची संचारबंदी, गर्दी केल्यास कलम 144 नुसार कारवाई होणार >> मॉल, बार, रेस्टॉरंट बंद करण्याचा निर्णय, ‘टेक अवे’ सर्व्हिस सुरु राहणार >> सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कामकाज केलं जाणार >> राज्यातील सर्व उद्योग चालू राहणार, उद्योग क्षेत्रातील कामगारांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. >> सर्व बांधकामे सुरु राहतील >> सरकारी ठेके असलेली कामेही सुरु राहणार >> भाजी मार्केटवर कुठल्याही प्रकारचे निर्बंध असणार नाहीत, फक्त गर्दी कमी करण्यासाठी कठोर नियम असतील >> शुटिंगवर गर्दी होणार नाही अशी ठिकाणी परवानगी दिली जाणार. मात्र राज्यातील चित्रपटगृहे बंद राहणार >> सर्व वाहतूक व्यवस्था सुरु राहणार. मात्र प्रवास करताना मास्क बंधनकारक >> 50 टक्के क्षमतेने सर्व सार्वजनिक वाहतूक सुरु राहणार
Maharashtra Weekend lockdown : राज्यात वीकेंड लॉकडाऊन जाहीर, शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कडकडीत बंदhttps://t.co/2dFGKyjCjh#MaharashtraLockdown #MaharashtraWeekendLockdown #coronavirus
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 4, 2021
संबंधित बातम्या :
lockdown in maharashtra: राज्यात वीकेंड लॉकडाऊन; शनिवार, रविवारी कडकडीत बंद
Weekend Lockdown | महाराष्ट्रात वीकेंड लॉकडाऊन, वाहतूक व्यवस्थेबाबत काय निर्णय?
PM Narendra Modi’s 5 point program to prevent the spread of corona