Corona Vaccine | देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात, 84 हजार 599 लाभार्थ्यांना पहिला डोस, महाराष्ट्रात किती?

भारतात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरुवात झाली आहे. (India Corona Vaccination)

Corona Vaccine | देशभरात 18 ते 44 वयोगटातील कोरोना लसीकरणाला सुरुवात, 84 हजार 599 लाभार्थ्यांना पहिला डोस, महाराष्ट्रात किती?
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 8:32 AM

मुंबई : देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. तर दुसरीकडे भारतात 1 मेपासून 18 ते 44 वर्षे वयोगटातील कोरोना लसीकरणाला (Corona Vaccine) सुरुवात झाली आहे. देशभरात काल दिवसभरात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 84 हजार 599 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस (First Dose) घेतला. तर महाराष्ट्रात संध्याकाळी सहापर्यंत जवळपास 11 हजार 492 लाभार्थ्यांनी लस घेतली. (India Corona Vaccination 18-44 Age Group 84599 beneficiaries get vaccine)

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने (Union Health and Family Welfare Ministry) दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 1 मे पासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. यावेळी 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. दरम्यान काही ठिकाणी लसीची कमतरता असल्याने लसीकरण प्रक्रिया सुरु झाली नाही.

महाराष्ट्रात 11 हजार 492 लाभार्थ्यांना लस

महाराष्ट्रात काल दिवसभरात 26 जिल्ह्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. यासाठी एकूण 132 लसीकरण केंद्र कार्यरत होते. यानुसार संध्याकाळी सहापर्यंत जवळपास 11 हजार 492 लाभार्थ्यांनी लस घेतली. तर उर्वरित जिल्ह्यात आजपासून लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत उत्पादकाकडे उपलब्ध असलेल्या साठयानुसार राज्याने या वयोगटासाठी कोव्हिशिल्ड लसीचे 3 लाख डोसेस खरेदी केले आहेत.

तर दुसरीकडे झारखंड सरकारने केंद्रीय अधिकृत संस्थांवर लस न दिल्याबद्दल अनेक आरोप केले होते. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आम्हाला कमीतकमी 50 लाख लस द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र लस न मिळाल्याने झारखंड सरकारला 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहिम सुरुवात करता आली नाही.

गुजरातमध्ये सर्वाधिक कोरोना लसीकरण

तसेच गुजरातमध्ये कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात शनिवारी राज्यातील दहा जिल्ह्यात लसीकरण करण्यात आले आहेत. यानुसार गुजरातमध्ये 18 ते 44 वर्षे वयोगटातील 55,000 हून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली. .ै लसीकरण मोहिमेतंर्गत 9 राज्यात एकूण 80 हजार लस देण्यात आल्या होत्या. यातील सर्वाधिक 55,235 लस या गुजरातमध्ये देण्यात आले होते.

गुजरात सरकारने काल दिवसभरात 60,000 लोकांना लसी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान 18 ते 44 वर्षे वयोगटातील लसीकरण मोहिम गुजरातमधील हॉटस्पाॉट ठरलेल्या दहा ठिकाणी देण्यात आली. या जिल्ह्यांमध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा, राजकोट, भावनगर, जामनगर, कच्छ, मेहसाणा, भरूच आणि गांधीनगर यांचा समावेश आहे. (India Corona Vaccination 18-44 Age Group 84599 beneficiaries get vaccine)

संबंधित बातम्या : 

कोरोनाची तिसरी लाट गृहीत धरूनच काटेकोर नियोजन करा; अजित पवारांचे प्रशासनाला आदेश

राज्यात आज 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.