Corona Vaccine | देशभरात 16 कोटी 71 लाख लाभार्थ्यांना कोरोना लस, कोणत्या वयोगटातील नागरिकांना कितपत लाभ?

देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेला वेग आला आहे. (India Corona Vaccination)

Corona Vaccine | देशभरात 16 कोटी 71 लाख लाभार्थ्यांना कोरोना लस, कोणत्या वयोगटातील नागरिकांना कितपत लाभ?
Corona Vaccination
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 8:15 AM

नवी दिल्ली : देशभरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीकरण (Corona Vaccine) मोहिमेला वेग आला आहे.  भारतात आतापर्यंत 16 कोटी 71 लाख जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. त्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील 14 लाख 78 हजार 865 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली.  (India Corona Vaccination Drive data)

16 कोटी 71 लाख लोकांचे लसीकरण

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत 16 कोटी 71 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. त्यात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील व्यक्तींचा समावेश आहे. तर 18 ते 44 वर्षे वयोगटातील 14 लाख 78 हजार 865 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. तर केंद्रशासित प्रदेशातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील 2 लाख 96 हजार 289 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.

कोणत्या वयोगटातील किती जणांचा समावेश?

देशात आतापर्यंत 16 कोटी 71 लाख 64 हजार 452 लोकांनी कोरोना लस घेतली ाहे. यात 95 लाख 19 हजार 788 आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 64 लाख 28 हजार 032 आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. तर फ्रंटलाईन वकर्स म्हणून काम करणाऱ्या 1 कोटी 38 लाख 49 हजार 396 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तर 76 लाख 31 हजार 653 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले. तसेच 18 ते 44 वर्षे वयोगटातील 14 लाख 78 हजार 865 जणांनी कोरोना लस घेतली आहे.

त्याशिवाय 45 ते 60 वर्षे वयोगटातील 5 कोटी 46 लाख 94 हजार 917 लोकांनी कोरोनाचा पहिला तर 58 लाख 29 हजार 433 लोकांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षांवरील 5 कोटी 34 लाख 89 हजार 421 जणांनी कोरोनाची पहिला डोस घेतला आहे. तर 1 कोटी 42 लाख 42 हजार 947 लोकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

देशातील बाधितांचे प्रमाण वाढते

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून देशभरात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत आहे. दररोज कोरोनाबाधितांपैकी जवळपास 50 टक्के बाधित हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. (India Corona Vaccination Drive data)

संबंधित बातम्या : 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अर्थव्यवस्थेवर असा होणार परिणाम; जाणून घ्या सरकारचा रिपोर्ट

‘कोविशिल्ड’च्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी रद्द; लसीचा भारतातच वापर करणार

कोरोनाची तिसरी लाट रोखली जाऊ शकते? केंद्राच्या मुख्य वैज्ञानिक सल्लागारांनी सांगितला उपाय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.