Weather Forecast : दिल्लीसह ‘या’ तीन राज्यांमध्ये कडाक्याची थंडी, जाणून घ्या विभागाच्या सूचना

देशात दिल्लीसह अनेक राज्यांत थंडी वाढली असून त्याची तीव्रता आगामी काही दिवसांत वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. (all state weather update)

Weather Forecast : दिल्लीसह 'या' तीन राज्यांमध्ये कडाक्याची थंडी, जाणून घ्या विभागाच्या सूचना
महाराष्ट्रात पावसाचा इशारा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 9:04 AM

नवी दिल्ली : देशात दिल्लीसह अनेक राज्यांत थंडी वाढली असून त्याची तीव्रता आणखी वाढणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. तसेच, उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये आगामी तीन दिवस कडाक्याच्या थंडीचे असण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हिमाचल आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीसह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय हवामान खात्याने नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. (india current weather update of all state)

राजस्थानमध्ये तीन दिवसासाठी ऑरेंज अलर्ट

राजस्थानातील पर्वतीय वारे मैदानी प्रदेशाकडे वाहू लागल्यामुळे थंडी वाढली आहे. येथे तीन दिवसांपर्यंत थंडी वाढणार आहे. तसेच, हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 30 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक शहरांत पारा 3 ते 5 अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे. हावामानातील हा बदल लक्षात घेऊन राजस्थानमधील काही भागांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भोपाळमध्ये तापमान 10 अंशावर

मध्यप्रदेशमध्ये 22 ठिकाणी तापमान 4 ते 10 अंशादरम्यान नोंदवण्यात आले. राज्यतील होशंगाबाद येथे पारा 13 अंशापर्यंत घसरला. तर इंदौरमध्ये तापनान 12.5 अंशापर्यंत आले होते. भोपाळमध्ये तापमान 10 अंशापर्यंत घसरले असून येथे थंडीची तीव्रता जास्त आहे.

पंजाबमध्ये आगामी चार दिवस कडाक्याची थंडी

पंजाबमध्ये कडाक्याची थंडी जाणवू लागली आहे. मागील काही दिवसांपासून असलेले ऊन, रविवारी झालेला पाऊस या सर्वांमुळे आज पंजाबमध्ये तापमानात घट झाली. राज्यातील अमृतसरमध्ये पारा सर्वात जास्त घसरल्याची नोंद करण्यात आली. या ठिकाणी तापमान 9.6 अंशापर्यंत खाली आले. अन्य जिल्ह्यांमध्ये तापमान 18 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.

काश्मीरमध्ये आगामी तीन दिवस बर्फवृष्टी

काश्मीरमध्ये सध्या थंडीची लहर आली आहे. येथे तापमान शून्य अंशाच्याही खाली गेले आहे. उत्तर काश्मीरमध्ये थंडीचा कहर जाणवत असून येतील गुलमर्ग भागात पारा -7.2 अंश सेल्सिअस पर्यंत घसरला आहे. तर रात्री गुलमर्ग येथील तापमान -6.5 अंश सेल्सिअस होते. दरम्यान, हवामानातील बदल आणि वाढती थंडी लक्षात घेऊन भारतीय हवामान खात्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईसह उपनगरात पारा घसरला, किमान तापमान 14 अंशावर

Petrol Diesel Price Today: जाणून घ्या मुंबईसह महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर

Ratan Tata: अब्जाधीश रतन टाटांनी लग्न का केलं नाही? स्वतःच सांगितलं ‘हे’ कारण

(india current weather update of all state)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.