पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी बंकर्स उद्ध्वस्त, भारताची धडाकेबाज कारवाई
भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केले आहे.
नवी दिल्ली : भारतीय सैन्याने दहशतवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक बंकर्स उद्ध्वस्त केले आहे. हे भारतासाठी मोठं यश मानलं जात आहे. 2 दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने लष्कर-ए-तोयबाच्या 2 दहशतवाद्यांना पडकलं होतं. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्या आधारे सैन्याने ही धडाकेबाज कारवाई केली (India destroy many bunkers of Terrorist in Pakistan POK).
याआधी देखील भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईत 20 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं. त्यावेळी देखील दहशतवाद्यांच्या छावण्या उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता देखील भारतीय सैन्याने ही मोठी कारवाई केली. थंडीच्या दिवसात पाकिस्तानमधून अनेक दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. त्यामुळेच भारताने या घुसखोरीला सडेतोड उत्तर देत घुसखोरी आधीच दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.
निवृत्त लष्कर अधिकारी सतीश ढगे या विषयावर बोलताना म्हणाले, “भारताने अचूक कारवाई करत दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड उद्ध्वस्त केले आहेत. काही दिवसांपूर्वीच भारताचे लष्करप्रमुख नरावणे यांनी देखील एलओसीच्या परिसरात पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लॉन्चपॅड आहेत. याशिवाय तेथील कोअर कमांडर यांनी देखील केरन सेक्टरमध्ये तब्बल 20 दहशतवादी लॉन्चपॅड असल्याचं म्हटलं होतं.”
“हिवाळ्यात शेकडो दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही महत्त्वाची माहिती भारताकडे होती. यावर भारतीय सैन्याने अचूक कारवाई केलीय. आता तरी पाकिस्तानने आपल्या देशातून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबवल्या पाहिजेत,” असंही सतीश ढगे यांनी नमूद केलं.
भारतीय सैन्याने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्चपॅडवर पिनपॉईंट स्ट्राईक केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या निवडक लॉन्चपॅडला लक्ष्य करत ते उद्ध्वस्त केले. यात पाकिस्तानसह काही परदेशी दहशतवादी ठार झाल्याचं बोललं जात आहे. या कारवाईत भारताला कोणतंही नुकसान झालेलं नाही.
पाकिस्तानमधून दहशतवाद्यांच्या घुसखोरीची तयारी होत असल्याने हल्ला
थंडीच्या दिवसांमध्ये पाकिस्तानमधून दहशतवादी मोठ्या प्रमाणात भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळेच भारतीय सैन्याने घुसखोरीच्या आधीच दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले.
पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधी उल्लंघन
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. याचा सीमेलगत भारतातील नागरी भागालाही फटका बसला. दरम्यान, गोळीबाराच्या आड लपून या काळात अनेक दहशतवादी घुसखोरीसाठी प्रयत्न करत होते. 2019 मध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात 18 सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. यावेळी हा आकडा 21 वर पोहचला आहे.
संबंधित बातम्या :
Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात
एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट
‘प्रज्ञा ठाकूरने मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती’
India destroy many bunkers of Terrorist in Pakistan POK