Pralay Missile | पाकिस्तानची अतिरेकी प्रशिक्षण केंद्र सेंकदात होणार उध्वस्त, भारताकडे येणार ‘प्रलय’ मिसाईल रेजिमेंट

'प्रलय क्षेपणास्र' हे जमिनीवरुन जमिनीवर डागता येणार क्षेपणास्र मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्र आहे. हे क्षेपणास्र शत्रूंच्या इंटरसेप्टर क्षेपणास्रांना टक्कर देण्यास समर्थ आहे.

Pralay Missile | पाकिस्तानची अतिरेकी प्रशिक्षण केंद्र सेंकदात होणार उध्वस्त, भारताकडे येणार 'प्रलय' मिसाईल रेजिमेंट
pralay missilesImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 1:51 PM

नवी दिल्ली | 18 सप्टेंबर 2023 : पाकिस्तानशी सुरु असलेले तणावपूर्ण संबंध आणि चीन बरोबरचा सीमावाद या पार्श्वभूमीवर आता भारतीय संरक्षण मंत्रालयाने सैन्याची मारक क्षमता वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्याच्या सुमारे 120 ‘प्रलय’ बॅलिस्टीक मिसाईल खरेदीला मंजूरी दिली आहे. या मिसाईलना चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ( एलएसी ) आणि पाकिस्तानला लागून असलेल्या नियंत्रण रेषा ( एलओसी ) वर तैनात केले जाणार आहे. या क्षेपणास्रांना इंटरसेप्टर क्षेपणास्रांद्वारे शोधणे शत्रूला अवघड होणार आहे.

प्रलयचे वैशिष्ट्ये काय आहे ?

‘प्रलय क्षेपणास्र’ हे जमिनीवरुन जमिनीवर डागता येणार क्षेपणास्र आहे. हे क्षेपणास्र इंटरसेप्टर क्षेपणास्रांना टक्कर देण्यास समर्थ आहे. प्रलय क्षेपणास्राला प्रगत क्षेपणास्रांप्रमाणे तयार केले आहे. या क्षेपणास्राची हवेत काही अंतर गेल्यानंतर दिशा बदलता येण्याची क्षमता आहे. प्रलय एक सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट मोटर आणि अन्य प्रणालीच्या मदतीने कार्यरत होते. यात अत्याधुनिक नेव्हीगेशन आणि एकीकृत एव्हीयोनिक्स यंत्रणा आहे. हे क्षेपणास्र आधी वायूसेनेत नंतर लष्करात भरती होईल. या क्षेपणास्राला डीआडीओने तयार केले आहे. याच्या पल्ल्यामध्ये वाढ देखील करण्याचा विचार सरकार करु शकते. या मिसाईलची साल 2015 मध्ये निर्मिती सुरु झाली. साल 2022 मध्ये 21 आणि 22 डिसेंबरला त्याची यशस्वी चाचणी झाली होती.

प्रलय क्षेपणास्राची मारक क्षमता 150 ते 500 किमीपर्यंत आहे. ते 350 ते 700 किलोग्रॅमपर्यंत स्फोटके वाहून नेऊ शकते. डीआरडीओने पृथ्वी क्षेपणास्राच्या धर्तीवर हे प्रलय तयार केले आहे. पाकिस्तानच्या कमी पल्ल्याच्या अण्वस्रवाहू क्षेपणास्राचा प्रतिकार करण्यासाठी प्रलयला तयार केले आहे. प्रलयची तुलना चीनच्या डोंग फेंग 12 ( css-x-15 ) आणि रशियाच्या इस्कंदर मिसाईल बरोबर केली जाऊ शकते. ज्याचा वापर युक्रेनमध्ये सध्या होत आहे.

चीन आणि पाकिस्तान सीमेवर का गरज

चीन आणि पाकिस्तान सीमेवर सतत धुमश्चंक्री होत असते. त्यातच चीन आणि पाकिस्तान दोघांनीही सीमेवर एलएसी आणि एलओसीवर त्यांच्या बॅलिस्टीक मिसाईल तैनात केल्या आहेत. त्यामुळे सुरक्षेसाठी भारतालाही हा निर्णय घ्यावा लागला आहे. प्रलय, ब्रम्होज सुपरसॉनिक क्रुज मिसाईल भारताच्या रॉकेट फोर्सचा आधार बनणार आहेत.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.