मान्सून या दिवशी बरसणार..! फक्त काही दिवसच उरले… ; या भागात प्रचंड कोसळणार…
भारताच्या हवामान खात्याने सांगितले आहे की, गेल्या महिन्यात नैऋत्य मोसमी वातावरणामुळे सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. त
नवी दिल्ली : यावर्षी मे महिन्यामध्ये हवामानाचे विविध रंग आपण अनेकदा पाहिले आहेत. प्रारंभीला अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण केला होता. मे महिन्यामध्येच लोकांच्या घरातील कुलर एसी आणि पंखे बंद असताना पाहायले मिळाले. मात्र आता तापमानात वाढ होऊ लागली आहे. आता दुपारी उष्णतेची लाट आणि त्या उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच आता पावसाळ्याला अवघे काही दिवस राहिले आहेत. त्यामुळे या परिस्थितीमध्ये मान्सून वेळेवर येणार की उशीर होणार असा सवाल आता नागरिक उपस्थित करु लागल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
यासोबतच असंही सांगण्यात आले आहे की भारतातील 19 टक्के प्रदेशातील लोकांना यंदाच्या मान्सूनमध्ये सामान्यपेक्षा कमी पावसाचा सामना करावा लागू शकणार आहे, 13 टक्के भागातील लोकांना मोठ्या पावसाचा सामना करावा लागणार आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारतातील भारतातील सुमारे 18.6 लोकांना मान्सूनचा कमी फटका बसणार आहे. तर उत्तरेकडील भागात कमी पावसाची 52 टक्के आणि देशाच्या मध्यवर्ती भागात 40 टक्के कमी पावसाची शक्यता आहे.
भारतातील एकूण 12.7 टक्के लोकांना सामान्यपेक्षा जास्त पावसाचा सामना करावा लागू शकतो. त्यातच भारताच्या दक्षिण आणि पूर्व भागात सामान्यपेक्षा 50 टक्के जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारताच्या हवामान खात्याने सांगितले आहे की, गेल्या महिन्यात नैऋत्य मोसमी वातावरणामुळे सामान्य पाऊस पडण्याची अपेक्षा आहे. तर स्कायमेट वेदर या खाजगी संस्थेकडून देशात मान्सूनच्या सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यंदाचा मान्सून 4 जून रोजी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मात्र 1 जून रोजीच केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर एका खासगी संस्थेने सांगितले आहे की, यंदा मान्सून केरळमध्ये 7 जून रोजी दाखल होणार आहे.
आयएमडीच्या अंदाजानुसार 3 दिवस पुढे-मागे असण्याची शक्यता आहे. स्कायमेटच्या मतानुसार एक शक्तिशाली वादळ सध्या विषुववृत्तीय अक्षांश आणि दक्षिण द्वीपकल्पात दक्षिण हिंद महासागराच्या दिशेने जात आहे. त्यामुळे मान्सून उशिरा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.