India-Pakistan | ‘भारताचे एजंट्स आमच्या देशात घुसून…’ पाकिस्तानचा भारतावर मोठा आरोप

| Updated on: Jan 26, 2024 | 11:19 PM

India-Pakistan | 2016 मध्ये पठाणकोट एअर बेसवर हल्ला झाला होता. त्याच्या मास्टर माइंड शाहीद लतीफला सियालकोटच्या मशिदीत गोळ्या घालून संपवलं होतं. त्यानंतर महिन्याभरापूर्वी अहमद ऊर्फ अबू कासिमला रावळकोटच्या मशिदीत गोळ्या घालून संपवलं.

India-Pakistan | भारताचे एजंट्स आमच्या देशात घुसून... पाकिस्तानचा भारतावर मोठा आरोप
India vs Pakistan
Follow us on

नवी दिल्ली : पाकिस्तानने भारतावर मोठा आरोप केलाय. मागच्या काही दिवसांपासून भारतविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात वेचून वेचून मारल जातय. दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हत्येमध्ये भारतीय एजंट्स सहभागी असल्याचा गंभीर आरोप पाकिस्ताने केला आहे. भारताने पाकिस्तानचा हा आरोप खोडून काढला आहे. जाणीवपूर्वक वाईट हेतूने भारताबद्दल हा प्रचार केला जातोय, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. ‘पाकिस्तानने जे पेरल तेच आज उगवतय’ असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले.

“पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांची काही वक्तव्य आम्ही मीडियामध्ये पाहिली. भारतावर खोटे आरोप करण्याचा आणि भारतविरोधी अजेंडा राबवण्याचा हा पाकिस्तानचा नवीन प्रयत्न आहे. सगळ्या जगाला माहितीय, पाकिस्तान हे दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि बेकायद कारवाया चालवणार मुख्य केंद्र आहे” असं परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं आहे.

कुठल्या दोन दहशतवाद्यांची हत्या झालेली?

“पाकिस्तान जे पेरणार तेच उगवणार. स्वत:च्या गैरकृत्यांसाठी इतरांना जबाबदार धरणं याच समर्थन होऊ शकत नाही किंवा हा तोडगा सुद्धा नाही” असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव मुहम्मद सायरस सज्जाद काझी यांच्या दाव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडून ही प्रतिक्रिया आली आहे. मागच्यावर्षी सियालकोट आणि रावळपिंडीमध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तयबाच्या दोन दहशतवाद्यांची हत्या झाली होती. त्यामध्ये भारतीय एजंट्स सहभागी असल्याचे भक्कम पुरावे आहेत, असं मुहम्मद सायरस सज्जाद काझी म्हणाले.

दोघांना मशिदीत गोळ्या घालून संपवलं

भारत पाकिस्तानात येऊन अशा प्रकारच्या कारवाया करत आहे, असा काझी यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केला. 2016 मध्ये पठाणकोट एअर बेसवर हल्ला झाला होता. त्याचा मास्टर माइंड शाहीद लतीफला 11 ऑक्टोबर 2023 रोजी सियालकोटच्या मशिदीत गोळ्या घालून संपवलं होतं. त्यानंतर महिन्याभरापूर्वी अहमद ऊर्फ अबू कासिमला रावळकोटच्या मशिदीत गोळ्या घालून संपवलं. तो 1 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये धानग्री येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यााच मास्टरमाइंड होता.

पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार भारतीय एजंट्सची काम करण्याची पद्धत काय?

“भारतीय एजंट्स पाकिस्तानात येऊन हत्या करण्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आणि टेक्नोलॉजीचा वापर करतायत. ते आपल मिशन पूर्ण करण्यासाठी गुन्हेगार, दहशतवाद्यांची निवड करतात, त्यांना पैसा पुरवतात” असा आरोप काझी यांनी केलाय. कॅनडा आणि अमेरिकेने सुद्धा काही दिवसांपूर्वी भारतावर असाच आरोप केला होता.