नवी दिल्ली : दरवर्षी प्रजासत्ताक दिनी (Republic Day Parade) त्या-त्या राज्यांची संस्कृती दर्शवणारे चित्ररथ सादर केले जातात. महाराष्ट्रही विविध थिमवर आधारित चित्ररथ सादर करत असतो. पण यंदाच्या प्रजासत्ताक दिनी परेडसाठी यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ नसण्याची शक्यता आहे. अंतिम निवडीसाठी 14 राज्यांना आमंत्रण पण त्यात महाराष्ट्राचा समावेश नाहीये, त्यामुळे यंदाच्या प्रजासत्ताकदिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ (Maharashtra Chitrarath) दिसण्याची शक्यता कमी आहे.
राज्यांची संख्या अधिक पण चित्ररथ दरवेळी ठराविक संख्येतच निवडावे लागतात त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार ही निवड होत असते. त्यामुळे यंदा महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.
अंतिम 14 राज्यांमध्ये यावेळी तामिळनाडू पश्चिम बंगाल केरळ या भाजपशासित नसलेल्या राज्यांचाही समावेश आहे. मागच्या वेळी चित्ररथाचा समावेश नसल्याने तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल ने आक्रमक भूमिका घेतलेली होती
गेल्या वर्षी महाराष्ट्राने जैवविविधता आणि मानके या विषयावर चित्ररथ साकारण्यात आला होता. या चित्ररथाला लोकपसंती मध्ये पहिला क्रमांक मिळाला होता.
याआधी 2020 मध्ये देखील परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नव्हता. आता दोन वर्षाच्या गॅपनंतर पुन्हा महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये दिसणार नाही.
1971 ते 2022 या 51 वर्षाच्या काळात महाराष्ट्राने 38 वेळा चित्ररथाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या परंपरेचे दर्शन घडवले आहे.
यासाठी महाराष्ट्राला 12 वेळा उत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कारही मिळाला आहे.
यंदा मात्र महाराष्ट्राला संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.