मुंबई : पुढच्यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. आतापासूनच या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांनी एकत्र येत INDIA आघाडी स्थापन केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हे देशातील सर्व विरोधी पक्षांसमोर लक्ष्य आहे. ताज्या ओपनियन पोलचा कल बघितला, तर त्यासाठी INDIA ला आणखी जास्त मेहनत करावी लागेल असं दिसतय.
कारण भाजपाप्रणीत NDA ला सत्तेतून खाली खेचणं इतकं सोप नाहीय. ताज्या सर्वेनुसार, पुन्हा NDA ची सत्ता येणार असं दिसतय. फक्त पुढच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या काही जागा कमी होऊ शकतात.
INDIA मुळे कुठल्या दोन पक्षांचा सर्वात जास्त फायदा?
INDIA च्या आघाडीमुळे काही पक्षांना फायदा होऊ शकतो. या नव्या आघाडीमुळे काँग्रेसला फार मोठा फायदा होतना दिसत नाहीय. काँग्रेस, समाजवादी पार्टी आणि जेडीयूला फार लाभ मिळेल असं वाटत नाहीय. पण आघाडीच्या काही पक्षांच्या जागा मात्र वाढू शकतात. सर्वात जास्त फायदा टीएमसी आणि आम आदमी पार्टीला होऊ शकतो.
पक्ष | जागा | फायदा/नुकसान |
---|---|---|
भाजपा | 290 | 13 सीट नुकसान |
काँग्रेस | 66 | 14 सीट फायदा |
आम आदमी पार्टी | 10 | 9 सीट फायदा |
टीएमसी | 29 | 7 सीट फायदा |
बीजेडी | 13 | 1 सीटी फायदा |
शिवसेना शिंदे गट | 2 | - |
शिवसेना उद्धव गट | 11 | - |
सपा | 4 | 1 सीट नुकसान |
आरजेडी | 7 | 7 सीट फायदा |
जेडीयू | 7 | 9 सीट नुकसान |
राष्ट्रवादी (शरद पवार) | 4 | - |
वायएसआर काँग्रेस | 18 | 4 सीट नुकसान |
टीडीपी | 7 | 4 सीट फायदा |
लेफ्ट फ्रंट | 8 | 3 सीट फायदा |
बीआरएस | 8 | 1 सीट नुकसान |
आम आदमी पार्टी आणि काँग्रेस दिल्ली-पंजाबमध्ये एकत्र लढले, तर AAP ला फायदा होईल. लोकसभा निवडणुकीआधी पब्लिक मूड जाणून घेण्यासाठी इंडिया टीवी-सीएनएक्सने ओपिनियन पोल घेतला.
ओपिनियन पोलनुसार, भाजपाला यावेळी पश्चिम बंगालमध्ये फटका बसू शकतो. प.बंगालमध्ये भाजपा यावेळी 42 पैकी फक्त 12 जागा जिंकू शकते. 40 जागा असलेल्या बिहारमध्ये भाजपाला 20 जागा मिळू शकतात. जेडीयूला 7 आणि आरजेडीला सुद्धा तितक्या जागा मिळू शकतात. एलजेपीला (R) ला 2, आरएलजेपीला 1, काँग्रेसला 2 आणि अन्यला 1 जागा मिळू शकते. उत्तर प्रदेशात भाजपाला एकट्याला 70 जागा मिळू शकतात.