मालदीवमधून भारत आपले सैन्य मागे बोलवणार का? आज होणार फैसला

| Updated on: Feb 02, 2024 | 5:11 PM

भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध आता ताणले गेले आहे. मागच्या सरकारसोबत भारताचे संबंध चांगले होते. पण नव्या सरकारने भारतविरोधी भूमिका घेतली आहे. चीन आणि श्रीलंकेपुढे आता हा देश मदतीची अपेक्षा करत आहे. असं असलं तरी भारत आपलं सैन्य मालदीवमधून माघारी बोलवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मालदीवमधून भारत आपले सैन्य मागे बोलवणार का? आज होणार फैसला
Follow us on

india maldive raw : भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध सध्या ताणले गेले आहेत. मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष हे भारत विरोधी मानले जातात. त्यामुळे सत्ताबदल झाल्यानंतर दोन्ही देशातील संबंध बिघडले आहेत. मालदीवमध्ये असलेली भारतीय सैन्याची उपस्थिती नव्या राष्ट्राध्यक्षांना सहन होत नाहीये. त्यांनी निवडणुकीत देखील अशी भूमिका घेतली होती. भारतीय लष्कराच्या उपस्थितीवरून आता दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. मालदीवचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ चर्चेसाठी दिल्लीत पोहोचले आहे. शिष्टमंडळात राजनैतिक आणि लष्करी प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. भारतासोबत या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी होणाऱ्या दुसऱ्या कोअर ग्रुपच्या बैठकीत ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

जवानांना माघारी बोलवण्याची मागणी

राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना माघारी बोलवण्याची मागणी भारताकडे केली होती. त्यांच्या मागणीनंतर कोअर ग्रुप तयार करण्यात आला. भारतीय सैनिक मालदीवमध्ये मानवतावादी हेतूने तैनात आहेत. 14 जानेवारी रोजी माले येथे कोअर ग्रुपची पहिली बैठक झाली.

या बैठकीबाबत मालदीवची भूमिका वेगळी होती. भारतीय लष्करी जवानांच्या मायदेशी परत पाठवण्याची गरज असल्याचं या बैठकीत भर देण्यात आली. मालदीवमध्ये सत्तेत आल्यापासून मोहम्मद मुइज्जू भारतीय सैन्याच्या माघारीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यांनी आपली संपूर्ण निवडणूक इंडिया आऊटच्या नावाने लढवली होती. मालदीवमधील लोकांमध्ये भारताची अशी प्रतिमा निर्माण करण्यात मोहम्मद मुइज्जू यशस्वी ठरले आहे.

भारतीय सैनिक काय करत आहेत?

भारतीय लष्कराचे सुमारे 77 जवान मालदीवमध्ये कार्यरत आहेत. हे लष्करी जवान मालदीवच्या लोकांच्या मदतीसाठी आहेत. येथे दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान आहे, ज्यांनी आतापर्यंत शेकडो वेळा लोकांना मदत केली आहे. मालदीवमध्ये उपस्थित असलेले भारतीय सैनिक ही विमाने आणि हेलिकॉप्टर चालवणार आहेत. COP-28 दरम्यान PM मोदी आणि अध्यक्ष मुइज्जू यांच्यात भेट झाली होती. त्यानंतर कोअर ग्रुप तयार करण्यावर एकमत झाले.

इतर देशांपुढे पसरवतोय हात

मावदीवच्या राष्ट्राध्यक्षांचा जास्त कल आता चीनकडे आहे. कारण त्याला चीनकडून मदतीची अपेक्षा आहे. असं असलं तरी त्याला चीनचा मनसुबा माहित नाही. कारण चीनने कर्ज देऊन अनेक देशांना अडचणीत आणलं आहे.

मालदीवमधून मोठ्या प्रमाणात लोकं उपचारासाठी भारतात येतात. पण आता राष्ट्राध्यक्षांनी श्रीलंकेपुढे हात पसरवले आहे. दोन्ही देशांमध्ये वैद्यकीय क्षेत्रात वाटाघाटी होण्याची शक्यता आहे. मालदीवमधील लोकांना श्रीलंकेत उपचारासाठी येण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून ही बोलणी सुरु आहे.