भारताचे लष्कर प्रमुख जनरल नरवणे 4 दिवसीय सौदी अरब आणि UAE दौऱ्यावर जाणार

भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे (Army chief Gen Naravane) पुढील आठवड्यात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहेत.

भारताचे लष्कर प्रमुख जनरल नरवणे 4 दिवसीय सौदी अरब आणि UAE दौऱ्यावर जाणार
Follow us
| Updated on: Dec 04, 2020 | 5:02 PM

नवी दिल्ली : भारताचे लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे (Army chief Gen Naravane) पुढील आठवड्यात महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा 4 दिवसीय असून त्यात ते सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरात (UAE) या दोन देशांना भेट देणार आहेत. या भेटीत ते दोन्ही देशांशी संरक्षणविषयक संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देतील. भारताच्या लष्कर प्रमुखांनी सौदी अरबला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे. नरवणे तेथे सौदी नॅशनल डिफेन्स युनिव्हर्सिटीमध्ये व्याख्यान देणार आहेत (Indian Army chief General M M Naravane will go Saudi Arabia and UAE next week on a Four day visit).

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल नरवणे रविवारी (6 डिसेंबर) या दौऱ्यावर रवाना होण्याची शक्यता आहे. लष्कर प्रमुखांचा हा सौदी अरब आणि संयुक्त अरब अमिरतचा दौरा 4 दिवसांचा असणार आहे. या दौऱ्यांच्या कार्यक्रमांना अंतिम रुप दिलं जात आहे. लवकरच याची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे पहिल्यांदा सौदी अरबला भेट देतील. या दौऱ्यात ते दोन्ही देशांच्या सैन्यदल प्रमुखांशी देखील चर्चा करणार आहेत. मागील काही वर्षांपासून सौदी अरब आणि यूएईसोबत भारताचे घनिष्ट संबंध तयार झाल्याचं पाहायला मिळालं आहे. त्या पार्श्वभूमीवर होत असलेला हा दौरा त्यामुळेच महत्त्वाचा मानला जात आहे.

भारतीय सैन्यात तिसऱ्या डेप्युटी चीफ (स्ट्रेटर्जी) पदाला मंजूरी

दरम्यान, भारतीय सैन्यासाठी मोठी बातमी आहे. आता भारतीय सैन्याच्या ‘आर्मी हेडक्वॉर्टर’च्या पुनर्गठनाला मंजूरी देण्यात आली आहे. यानंतर आता तिसऱ्या डेप्युटी चीफ (स्ट्रेटर्जी) पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या भारतीय सैन्यात दो डेप्युटी चीफ होते. डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (इन्फॉर्मेशन सिस्टम अँड ट्रेनिंग) आणि डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ (प्लॅनिंग अँड सिस्टम) अशी त्यांची नावं होती.

हेही वाचा :

Nagrota Encounter: दहशतवाद्यांना मोबाईलद्वारे थेट पाकिस्तानमधून सूचना, पुरावे सापडले; पाकिस्तानच्या राजदूतांना समन्स

दहशतवाद्यांचा पुन्हा 26/11 हल्ला घडवण्याचा कट? पंतप्रधान मोदींची अमित शाह आणि अजित डोवाल यांच्यासोबत बैठक

आधी PoK मध्ये पिनपॉईंट स्ट्राईकची चर्चा, आता भारतीय सैन्यानं वृत्त फेटाळलं

व्हिडीओ पाहा :

Indian Army chief General M M Naravane will go Saudi Arabia and UAE

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.