आधी PoK मध्ये पिनपॉईंट स्ट्राईकची चर्चा, आता भारतीय सैन्यानं वृत्त फेटाळलं

भारतीय लष्कराने पिनपॉईंट स्ट्राईकचं वृत्त फेटाळलं आहे. सीमेवरील नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार झालेला नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय सैन्याने दिलं.

आधी PoK मध्ये पिनपॉईंट स्ट्राईकची चर्चा, आता भारतीय सैन्यानं वृत्त फेटाळलं
आर्मी डेंटल कॉर्प्समध्ये भरती
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 9:03 PM

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी लॉन्चपॅड उद्ध्वस्त केल्याची जोरदार चर्चा होती. यात अनेक दहशतवादी मारले गेल्याचंही सांगितलं गेलं. मात्र, काही वेळातच भारतीय लष्कराने हे वृत्त फेटाळलं आहे. सीमेवरील नियंत्रण रेषेवर कोणताही गोळीबार झालेला नसल्याचं स्पष्टीकरण भारतीय सैन्याने दिलं आहे (Indian Army clarify over news of Pinpoint Strike over terrorist launch pad in PoK).

सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, भारताने 13 नोव्हेंबर रोजी दहशतवाद्यांच्या काही बंकरवर हल्ला चढवला होता. यात अनेक बंकर्स उद्ध्वस्त झाले होते. दरम्यान, भारताचे लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात आलेला कोणताही दहशतवादी जीवंत परत जाणार नाही, असा इशारा दिला आहे.

भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत सांगितलं आहे, “आज नियंत्रण रेषेवर कोणत्याही प्रकारचा गोळीबार झालेला नाही.”

दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या नागरोटा येथे आज पहाटे झालेल्या अतिरेकी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या चार अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे यांनी भारतात घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना सज्जड दम भरला आहे. सीमेवरून भारतात होणारा घुसखोरीचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. नियंत्रण रेषेवरून घुसखोरीचा प्रयत्न केल्यास एकही अतिरेकी जिवंत परतणार नाही, असा निर्वाणीचा इशाराच नरवणे यांनी दिला आहे. (Terrorists crossing LoC won’t be able to survive: Army Chief)

नियंत्रण रेषेवरून होणारी घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही. या घुसखोरी करणाऱ्या अतिरेक्यांना तिथल्या तिथेच कंठस्नान घातल्या जाईल. हे अतिरेकी परत पाकिस्तानात जाऊ शकणार नाहीत. हा संदेश पाकिस्तान आणि त्यांच्या अतिरेक्यांसाठी पुरेसा आहे, असं नरवणे यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या :

Indian Special Force | पाकिस्ताननंतर टार्गेट चीन, ‘सर्जिकल स्ट्राईक’ची स्पेशल फोर्स पुन्हा रणांगणात

एअर स्ट्राईकमध्ये 170 दहशतवाद्यांचा खात्मा, इटलीच्या पत्रकाराचा ग्राऊंड रिपोर्ट

‘प्रज्ञा ठाकूरने मसूदला शाप दिला असता, तर सर्जिकल स्ट्राईकची वेळ आली नसती’

Indian Army clarify over news of Pinpoint Strike over terrorist launch pad in PoK

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.