नवी दिल्ली – सैन्यदलाच्या (Indian Army) आधुनिकीकरणात (modernization)देशाने एक पाऊल पुढे टाकले आहे. पाकिसतान आणि चीनच्या सीमेवरील वाढत्या आव्हानांचा विचार करता, सैन्याचे आधुनिकीकरण आता प्रत्यक्षात होताना दिसते आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी (Rajnath Singh)आज दिल्लीमध्ये सैन्यदलाला नवी स्वदेशी हत्यारे सोपवली आहेत. त्यात एन्टी पर्सनल माईन निपुण, एके-203 रायफल, एफ अन्सास रायफल्स यांच्यासह ड्रोन्स यांचा समावेश आहे. ईईएल आणि अन्य भारतीय कंपन्यांनी ही हत्यारे विकसीत केलेली आहेत. या कार्यक्रमादरम्यान ही सगळी हत्यारे सैन्यदालाला सुपूर्द करण्यात आली, तसेच नव्या एके 203 रायफल आणि त्यामुळे सैन्यदलाला होणाऱ्या फायद्याचे सादरीकरणही सैनिकाकडून प्रात्यक्षिकाद्वारे करण्यात आले.
I assure on behalf of the Army chief that the Indian Army is prepared to tackle any threat whether it is western desert or the high altitude locations in Ladakh sector: Lt Gen Harpal Singh pic.twitter.com/d8m4TeH6ZD
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) August 16, 2022
संरक्षण क्षेत्रात स्वदेशीकरणाला प्रोत्साहन आणि गती देण्यासाठी केंद्र सरकारने अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घेतले, असे लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह यांनी सांगितले. या नव्या स्वदेशी हत्यांरांमध्ये माईन्स, प्रत्यक्ष समोरासमोर लढाई करण्याची हत्यारे, युद्धासाठी आवश्यक असलेली लढआऊ वाहने यांचाही समावेश आहे. या कार्यक्रमात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना भारतीय सैन्यदलात भविष्यात लढाईसाठी जाणाऱा सैनिक कसा सज्ज असेल, त्याच्याकडे कोणती नवी हत्यारे असतील, त्याच्याकडे एके 203 रायफल कशी असेल याची माहिती प्रत्यक्षरुपात देण्यात आली. सैन्यदलाच्या फ्युचरिस्टिक इन्फेन्टी सोल्जर इन ए सिस्टिम (एस-इंसास) चे हे सादरीकरण होते.
#WATCH Indian Army’s Futuristic Infantry Soldier as a System (F-INSAS) soldier gives a briefing to Defence Minister Rajnath Singh on his new weapon systems and aids including the AK-203 assault rifle#Delhi pic.twitter.com/66aVvIfqHL
— ANI (@ANI) August 16, 2022
चीनला लागून असलेल्या सीमेच्या परिसरातील पेंगॉग लेकमध्ये तैनात असलेल्या लँडिंग क्राफ्ट असल़ल्टच्या क्षमतेचे प्रात्यक्षिकही यावेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना दाखवण्यात आले. या लेकमध्ये सैन्यदलाच्या नबोटीमध्ये 35 लढाऊ सैनिक एकाचवेळी प्रवास करु शकणार आहेत, इतकेच नाही तर अत्यंत कमी वेळात ते या तलावात कोणत्याही ठिकाणी पोहचू शकणार आहेत. या बोटींची निर्मिती आणि देखरेख ही कॉर्प्स ऑफ इंडिनिअर्सच्या माध्यमातून करण्यात येणार ाहे. या बोटीही आज राजनाथ सिंह यांच्या हस्ते सैन्यदलाला देण्यात आल्यात.
#WATCH | Indian Army showcased capability of the Landing Craft Assault deployed in Pangong lake by the force along the LAC with China to Defence Minister Rajnath Singh today. The boats can carry 35 combat troops at a time and can reach any area of the lake in a very short time pic.twitter.com/ejiJVATY5m
— ANI (@ANI) August 16, 2022
वास्तविक नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी आणि चिनी सैन्यावर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्सही भारतीय सैन्यदलाला आज देण्यात आले आहेत. या ड्रोन्समुळे दुर्गम भागातील शत्रूराष्टाच्या सैन्यदलावर नजर ठेवता येणे आता भारतीय सैन्याला सहज शक्य होणार आहे. तसेच यावेळी सैन्यदलाला, स्वदेशी लढाऊ वाहनेही यावेळी राजनाथ सिंह यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली आहेत.
#WATCH Indian Army has received a drone system manufactured indigenously for troops to help an eye on enemy troops in the forward areas along the LAC
Defence Minister also handed over the Made in India infantry combat vehicles to the troops deployed in the forward areas pic.twitter.com/YmeGpoO1eU
— ANI (@ANI) August 16, 2022
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज लडाखच्या सियाचिन ग्लेशियरजवळ असलेल्या परतापूर सैन्यतळावरील सैनिकांसाठी 1 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे समर्पणही करण्यात आले. या भागात असलेले वीज प्रकल्प हे प्रामुख्याने डिझेलवर अवलंबून असतात, हे डिझेलवरील अवलंबित्व कमी व्हावे यासाठी इंजिनिअर्सच्या कोअर ग्रुपमे हा सौर उर्जा प्रकल्प निर्माण केला आहे. या सौर उर्जा प्रकल्पातून या सैन्यतळाची विजेची गरज पूर्ण होणार आहे.
#WATCH | Defence Minister Rajnath Singh today handed over a 1 MW solar power project at the Partapur Army base near Siachen glacier in Ladakh. The power plant built by the Corps of Engineers will help in meeting the power needs of the force rescuing dependency on diesel. pic.twitter.com/27V2gly7Z7
— ANI (@ANI) August 16, 2022
या कार्यक्रमात भारतीय सैन्याचे मुख्य इंजिनिअर लेफ्टनंट हरपाल सिंह हे उपस्थित होते. भारतीय सैन्यदल प्रमुखांच्या वतीने त्यांनी या कार्यक्रमाला संबोधित केले. देशासमोर असलेल्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी भारतीय सैन्यदल सज्ज आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी सगळ्या देशाला दिले. वाळवंटी भाग असलेला पश्चिम पाकिस्तान असो वा सर्वाधिक उंचीवरील चीनला लागू असलेल्या सीमा असो, त्या सगळ्या परिसरात भारतीय सैन्यदल सक्षमपणे पाय रोवून उभे असल्याचे हरपाल सिंह यांनी यावेळी सांगितले. भारतीय सैन्यदलाला देण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमुळे सैन्यदलाचे मनोबल उंचावरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शत्रुंशी लढा देताना ही नवी हत्यारे अधिक उपयुक्त ठरणारी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.