मनमोहन सिंग यांना या गोष्टीची आयुष्यभर खंत, ही इच्छा आता कधीच पूर्ण नाही होणार
Ex Prime Minister Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एका आव्हानात्मक काळात भारताचे सारथ्य केले आणि या देशाला एक नवीन दिशा दिली. पण त्यांचे एक स्वप्न अपूर्ण राहिले. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी त्यांच्या मुलाखतीत त्याचा उल्लेख केला आहे.
देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आता आपल्यात नाहीत. गुरूवारी ते अचानक बेशुद्ध झाले. त्यांना दिल्लीतील एम्स रुगालयात दाखल करण्यात आले. 92 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कुशल अर्थतज्ज्ञ, दुरदुष्टीच्या या सालस नेत्याने बुद्धिवाद्यांना सुद्धा राजकारण करता येते हे दाखवून दिले. त्यांची निधन वार्ता धडकताच त्यांच्या अंतिम इच्छेची चर्चा सुरू झाली. ही इच्छा पूर्ण न करता आल्याची खंत त्यांना आयुष्यभर होती. आता त्याची ही अंतिम इच्छा अपूर्ण राहणार असल्याने अनेक जण हळहळले.
26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी फाळणीच्या वेदना सहन केल्या आहे. हक्काची माणसं, हक्काची जमीन सोडून त्यांना आयुष्याच्या एका वळणावर सर्व सोडून यावं लागलं. तिथल्या मातीची, माणसांच्या आठवणींचा ठेवा त्यांनी आठवणींच्या रूपाने जपला. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी एका मुलाखतीत डॉ. मनमोहन सिंग यांच्या या अखेरच्या इच्छेचा उल्लेख एका मुलाखतीत केल. पण ही इच्छा पूर्ण न करता आल्याची खंत आता कायम आहे.
मनमोहन सिंग यांना या गोष्टीची खंत
एका मुलाखतीत काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी मनमोहन सिंग यांच्या त्या इच्छेविषयी माहिती दिली. परदेशात नोकरी करताना मनमोहन सिंग हे त्यांच्या पाकिस्तानातील मित्रासह रावळपिंडी या शहरात गेले होते. या भेटीदरम्यान ते तेथील गुरुद्वारात पण गेले. बैसाखी सणाला ते या ठिकाणी येत असत. पण तिथूनच जवळ असलेल्या त्यांच्या गावी त्यांना काही जाता आले नाही.
मनमोहन सिंग लहान असताना त्यांच्या आईचं निधन झालं होतं. त्यांच्या आजीने त्यांचे पालनपोषण केलं. फाळणीपूर्व झालेल्या दंगलीत त्यांच्या आजीची हत्या झाली. या घटनेने त्यांच्या मनावर मोठा आघात केला. या घटनेनंतर ते पेशावर येथे त्यांच्या वडीलांच्या घरी गेले. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान त्यांना माध्यमिक शाळा सोडून भारतात यावे लागले.
गावाची खूप आठवण येत आहे…
राजीव शुक्ला यांनी त्यांच्या अंतिम इच्छेची माहिती दिली. त्यानुसार, भारताचे पंतप्रधान असताना त्यांना एकदा पाकिस्तानमध्ये जायचे होते. त्यांना त्यांच्या गावाला भेट द्यायची होती. ज्या ठिकाणी त्यांचे बालपण गेले, ते गाव त्यांना पाहायचे होते. त्या शाळेत ज्यायचे होते, जिथे ते शिकले. राजीव शुक्ला हे पंतप्रधान निवासस्थानी असताना मनमोहन सिंग यांनी त्यांची ही इच्छा व्यक्त केली. ते म्हणाले गावाची खूप आठवण येत आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन या गावाला भेट देण्याची इच्छा दाटून येत आहे. पण ही इच्छा आता अपूर्णच राहिली. ती कधीच पूर्ण करता येणार नाही.