आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीविरोधात IMA आक्रमक, 11 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक

11 डिसेंबरला होणाऱ्या देशव्यापी बंदमुळे कोरोना रुग्णांचा कोणताही त्रास होणार नाही. कोविड रुग्णांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवा बजावणार आहे. त्याचबरोबर अतिआवश्यक सेवाही सुरुळीत राहतील, असं आयएमएकडून सांगण्यात आलं.

आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या परवानगीविरोधात IMA आक्रमक, 11 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक
Follow us
| Updated on: Dec 02, 2020 | 10:23 AM

नवी दिल्ली: आयुर्वेद डॉक्टरांसाठी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association)आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुर्वेदाची पदवी घेतलेल्या डॉक्टरांना आता जनरल आणि ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेसह डोळे, कान आणि घशाची शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. भारतीय चिकिस्ता केंद्रीय परिषद (Central Council of Indian Medicine)ने दिलेल्या माहितीनुसार सरकारने परवानगी दिल्यानंतर पदव्यूत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना शस्त्रक्रियेबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे. दरम्यान, सरकारच्या या निर्णयाविरोधात आयएमएने 11 डिसेंबरला देशव्यापी बंदची हाक दिली आहे. (IMA calls for nationwide agitation on December 11)

कोरोना रुग्णांच्या सेवेवर परिणाम नाही

11 डिसेंबरला होणाऱ्या देशव्यापी बंदमुळे कोरोना रुग्णांचा कोणताही त्रास होणार नाही. कोविड रुग्णांसाठी डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी सेवा बजावणार आहे. त्याचबरोबर अतिआवश्यक सेवाही सुरुळीत राहतील, असं आयएमएकडून सांगण्यात आलं. हे देशव्यापी आंदोलन 11 डिसेंबरला सकाळी 6 वाजेपासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असेल, असंही आयएमएकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सध्या शस्त्रक्रियेबाबत शिकवलं जातं. पण ते एखादी शस्त्रक्रिया करु शकतात की नाही, याबाबत कुठलीही स्पष्ट नियमावली नव्हती. आता केंद्र सरकारकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार आता आयुर्वेदाचे डॉक्टरही शस्त्रक्रिया करु शकणार आहेत. सरकारच्या निर्देशानुसार आयुर्वेदाचे पदव्यूत्तर पदवीचे विद्यार्थ्यांना आता डोळे, कान, नाक आणि घशाच्या शस्त्रक्रियेसाठी प्रशिक्षण दिलं जाणार आहे.

डोळे, कान, नाक, घसा यासह आयुर्वेदाच्या डॉक्टरांना ग्लुकोमा, मोतीबिंदू, स्तनाची गाठ, अल्स आणि पोटासंबंधी काही शस्त्रक्रियाही करता येणार आहेत. तसं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

नवे नियम काय सांगतात?

नव्या नियमांनुसार आयुर्वेदच्या विद्यार्थ्यांना अभ्यास करतानाच शस्त्रक्रिया आणि शस्त्रक्रियेशी संबंधित इतर प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या विद्यार्थ्यांना दोन टप्प्यात हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यात पहिला भाग एमएस (आयुर्वेद) जनरल सर्जरी आणि एमएस (आयुर्वेद) शालक्य तंत्र (डोळे, कान, नाक, घसा, डोके आणि दात रोग) यासारख्या शस्त्रक्रियांचा समावेश असेल. इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) यावर बोलताना या निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये काहीशा गोंधळाची स्थिती तयार होऊ शकते, अशी शंका उपस्थित केली आहे. त्यानंतरच आयुष मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं आहे.

संबंधित बातम्या:

आधी आयुर्वेदीक डॉक्टरांना शस्त्रक्रियेची परवानगी, आता आयुष मंत्रालयाचं निर्णयावर स्पष्टीकरण

कोरोना नियंत्रणासाठी आयुर्वेदा किट, रोग प्रतिकारकशक्ती वाढत असल्याचा दावा

IMA calls for nationwide agitation on December 11

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.