कोरोना विरोधातील लढाईत भारताची सेनादलं कार्यरत, इंडियन नेव्हीने लक्षद्वीपला पोहोचवला ऑक्सिजन

इंडियन नेव्हीच्या साऊदर्न नावल कमांडनं कोची येथून ऑक्सिजन केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप बेटांवर पोहोचवला आहे. Indian Navy oxygen to Lakshadweep

कोरोना विरोधातील लढाईत भारताची सेनादलं कार्यरत, इंडियन नेव्हीने लक्षद्वीपला पोहोचवला ऑक्सिजन
भारतीय नौदलाचं कोरोना काळातील कार्य
Follow us
| Updated on: Apr 26, 2021 | 12:51 PM

नवी दिल्ली: भारत सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेला सामोरा जात आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत विक्रमी वाढ नोंदवली गेली आहे. 24 तासात 3 लाख 52 हजार 991 कोरोना रुग्ण आढळून आले तर 2812 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 19 हजार जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्व यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. इंडियन आर्मी, एअरफोर्स नंतर इंडियन नेव्हीदेखील कोरोना विषाणू विरोधातील लढाईत उतरली आहे. (Indian Navy lends a helping hand in delivering oxygen to Lakshadweep)

कोरोना विरुद्धच्या लढाईत भारतीय नौदलाचं योगदान

भारतीय नौदलानं देखील कोरोना विषाणू संसर्गात नागरिकांचं रक्षण करण्यासाठी योगदान देण्यास सुरुवात केली आहे. इंडियन नेव्हीच्या साऊदर्न नावल कमांडनं कोची येथून ऑक्सिजन केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप बेटांवर पोहोचवला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. कोची ते लक्षद्वीप बेटे यातील अंतर 500 किमी आहे.

35 ऑक्सिजन सिलेंडर लक्षद्वीपला  पोहोचवले

भारतीय नौदलाच्या आयएनएस शारदा या लढाऊ जहाजावरुन 35 ऑक्सिजन सिलेंडर, रॅपिड अँटिजेन टेस्ट किट, पीपीई किट आणि इतर साहित्य लक्षद्वीपला पोहोचवण्यात आले. लक्षद्वीप बेटांवर सध्या 1200 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. लक्षद्वीपची लोकसंख्या 64 हजार 429 इतकी आहे.

कोचीमध्ये लक्षद्वीपच्या रुग्णांसाठी बेड राखीव

संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार कोचीमध्ये 10 आयसीआयू बेड लक्षद्वीपच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. नावल एअर स्टेशन आयएनएसवर देखील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास रुग्णांना हलवण्यासाठी हेलिकॉप्टरचा देखील वापर केला जाऊ शकतो.

कोरोना संकटावर मात करण्यासाठी तिन्ही संरक्षण दलं सक्रिय

कोरोना विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी भारताची प्रमुख संरक्षण दलं म्हणजेच इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेव्ही कार्यरत असल्याचं चित्र आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस साठी इंडियन आर्मीसाठी राखीव असलेले रॅक वापरले जात आहेत. तर, भारतीय हवाई दलाच्या मदतीनं रिकामे ऑक्सिजन टँकर्स एअरलिफ्ट केले जात आहेत.

संबंधित बातम्या:

नातवंडं म्हणाली, आजी नव्वदी झालेय, गडाखालीच थांब, कोरोनाला हरवलेल्या आजींनी पोरांना मागे टाकलं

कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मधासोबत खा ‘हा’ स्पेशल मसाला!

(Indian Navy lends a helping hand in delivering oxygen to Lakshadweep)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.