Indian Navy ला मिळाला नवीन ध्वज; गुलामगिरीच्या प्रतिकापासून मुक्ती; नव्या ध्वजाबद्दल पंतप्रधान म्हणाले…

भारतीय नौदलाला आता नवीन ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज फडकताना दिसणार आहे.

Indian Navy ला मिळाला नवीन ध्वज; गुलामगिरीच्या प्रतिकापासून मुक्ती; नव्या ध्वजाबद्दल पंतप्रधान म्हणाले...
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 12:50 PM

नवी दिल्लीः लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट (Red Fort 15 August) रोजी देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेतून शतप्रतिशत मुक्तीचा संकल्प घेऊन पुढे जायचे आहे. आज प्रत्येक क्षेत्रात भारत हा जगातील महासत्ता असणाऱ्या देशांच्या बरोबरीने पुढे पुढे जात आहे. आजपर्यंत भारतीय नौदलाच्या (Indian Navy) ध्वजावर गुलामगिरीचे प्रतीक दिसत होते, ते आता काढला जाऊन आज 2 सप्टेंबरपासून भारतीय नौदलाला नवा ध्वज (New Flag) मिळत आहे. भारतीय नौदलाला आता नवीन ध्वज मिळाला असून वसाहतवादाचा भूतकाळ या ध्वजामुळे दूर होणार असून यामुळे आता भारताचा समृद्ध सागरी वारसा जगासमोर दिसणार आहे. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज फडकताना दिसणार आहे.

या नव्या ध्वजाच्या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शाम नो वरुण:’ असे नाव कोरलेले आहे. याचा अर्थच असा आहे की, पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ असू देत. भारतीय सनातन परंपरेत वरुणाला पाण्याची देवता मानले जाते असाही त्याचा अर्थ सांगितला गेला आहे.

नवीन ध्वजाचा अर्थ?

भारतीय नौदलाच्या ध्वजामध्ये झालेला हा बदलाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, आपल्याला गुलामगिरीचे प्रतीक हटवायचे आहे. आतापर्यंत चालत आलेला ध्वज पाहिला तर त्यामध्ये असलेला क्रॉस हा ब्रिटनच्या राष्ट्रीय ध्वजाशी साम्य आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगावरील लाल क्रॉस सेंट जॉर्ज क्रॉस म्हणून ओळखला जाते. सेंट जॉर्ज क्रॉसचे नाव एका ख्रिश्चन संताच्या नावावर ठेवण्यात आले असून तो तिसऱ्या धर्मयुद्धाचा योद्धा असल्याचेही सांगितले जात आहे. इंग्लंडच्या राष्ट्रीय ध्वजावरही त्याच सेंट जॉर्ज क्रॉसचे चिन्ह असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आता सर्व युद्धनौका, ग्राउंड स्टेशन आणि नौदल एअरबेसवर नौदलाचा ध्वज दिमाखात फडकताना दिसणार आहे.

छत्रपती शिवरायांचा आदर्श

नौदलाच्या नवीन ध्वजामध्ये वरच्या कोपऱ्यावर भारताचा तिरंगा आहे. तर दुसर्‍या अर्ध्या भागामध्ये नौदलाची शिखा आहे. हे निळे चिन्ह अष्टकोनाच्या आकारात असून जे भारतीय नौदलाच्या चारही दिशा आणि चार कोन म्हणजे आठ दिशा दाखवते. या अष्टकोनी बोधचिन्हाच्या खाली देवनागरीत ‘शाम नो वरुण:’ असे नाव कोरलेले आहे. याचा अर्थच असा आहे की, पाण्याची देवता वरुण आपल्यासाठी शुभ असू देत. भारतीय सनातन परंपरेत वरुणाला पाण्याची देवता मानले जाते असाही त्याचा अर्थ सांगितला गेला आहे.

अष्टकोनी चिन्ह

काठावर दोन सोनेरी किनारी असलेले अष्टकोनी चिन्ह देशाचे महान मराठा योद्धा, छत्रपती शिवाजी यांच्या युद्धनीती शास्रातील ढालीने प्रेरित असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दूरदृष्टीकोनातूनच नौदलाची स्थापना करण्यात आली आहे. 60 लढाऊ जहाजे आणि 5000 सैन्यांसह त्यांनी सागरी मार्गाने घुसखोरी करणाऱ्या बाह्य सैन्याला आव्हान दिले असल्याचा इतिहासही नौदलासमोर असल्याचे सांगण्यात आले आहे.

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.