सॅम पित्रोदा यांचा अखेर राजीनामा, वांशिक टिपण्णी महागात पडली, काय आहे प्रकरण
इंडियन ओव्हरसिज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणूकांत कॉंग्रेसला बॅकफूटवर जावे लागले आहे.
लोकसभा निवडणूकांदरम्यान वादगस्त वक्तव्य करुन अडचणीत आलेले कॉंग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांनी अखेर राजीनामा दिला आहे. इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस पक्षाने त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे. याची माहीती पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी स्वत: ट्वीटर हॅंडलवर दिली आहे. सॅम पित्रोदा यांनी स्वत: हून इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असल्याचे ट्वीट जयराम रमेश यांनी केले आहे.
इंडियन ओव्हरसिज कॉंग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ते भारतातील अनेक भागात राहणाऱ्या नागरिकांच्या रंगावरुन राहणीमानावरुन तुलना करताना वांशिक टिपण्णी करताना दिसत आहेत. त्यांनी पूर्वेकडील भारतीयांची तुलना चीनी लोकांशी तर दक्षिण भारतीय लोकांची तुलना आफ्रिकन लोकांनी करताना आढळत आहेत. यावरुन कॉंग्रेस पक्षावर मोठी टीका होत आहे. कॉंग्रेसने या प्रकरणात हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. पक्षाशी याचा काही संबंध नसल्याचे म्हणत स्पष्टीकरण केले आहे. सॅम पित्रोदा यांनी भारतातील विविधता सांगताना केलेली तुलना दुर्दैवी आणि स्वीकारण्या योग्य नाही. भारतीय कॉंग्रेस यास दुजोरा किंवा समर्थन करत नसल्याचे कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी पॉडकास्टमध्ये स्पष्ट केले आहे.
काय म्हटले होते
सॅम पित्रोदा यांनी भारत विविधतेने नटलेला देश आहे. भारताच्या पूर्वेला राहणारे हिंदूस्थानी लोक चीनी लोकांसारखे दिसतात. तर पश्चिमेला राहणारे लोक अरबांसारखे आणि उत्तर भारतात राहणारे लोक गोऱ्यांसारखे तर दक्षिण भारतात राहणारे लोक आफ्रिकी लोकांसारखे दिसतात. परंतू याने काही फरक पडत नाही. आपण सर्व देशाचे नागरिक बंधू भगिनी आहोत. आम्ही विविध भाषांचा, धर्माचा आणि रितीरिवाजांचा सन्मान करतो. भारतात प्रत्येक धर्माला सन्मान मिळतो. तसेच प्रत्येक जण एकमेकांसाठी थोड्या प्रमाणात तडजोड करतो असे त्यांनी म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
वारसा करावर देखील वक्तव्य
याआधी देखील सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन कॉंग्रेस पक्षाला तोंडघशी पाडले होते. त्यांनी राहुल गांधी यांनी कॉंग्रेस सरकार आले तर साधनसामुग्रीवर सर्वांचा सारखाच अधिकार राहील. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक प्रचारात हाच धागा पकडून कॉंग्रेस आता तुमच्या घरात डोकावणार तुमची संपत्ती किती आहे ती मोजणार. आणि या संपत्तीचे गरीब आणि अल्पसंख्यांकांना वाटप होणार अशी टीका केली होती. भारतात एखाद्याकडे जर दहा अब्ज रुपयांची संपत्ती आहे. आणि तो उद्योजक जर मरण पावला तर ही संपत्ती संपूर्णपणे त्यांच्या मुलांना मिळते. जनतेला या संपत्तीचा काही उपयोग मिळत नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी अशी भूमिका या संदर्भात सॅम पित्रोदा यांनी मांडली होती. त्यावेळी देखील भाजपाने टीका करीत कॉंग्रेस आता मंगळसूत्र देखील काढून ते मुस्लीमांना देणार असल्याची टीका पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी सभांमधून केली होती.