Indian Railway कडून तात्काळ तिकीटबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या

Tatkal Ticket Booking Rules: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी तात्काळ तिकीटाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घ्या नक्की काय निर्णय घेण्यात आला आहे.

Indian Railway कडून तात्काळ तिकीटबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या
indian railway tatkal ticket
Follow us
| Updated on: Dec 11, 2024 | 10:04 PM

भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीटबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारतीय रेल्वेकडून तात्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांना या बदलामुळे तात्काळ तिकीट बुकिंग प्रोसेस सहज आणि सोपी होईल, असं रेल्वेला वाटतं. नव्या नियमांनुसार, एसी कोचमधील तात्काळ बुकिंगला सकाळी 10 वाजता सुरुवात होईल. तर नॉन एसीच्या तात्काळ तिकीटसाठी सकाळी 11 वाजेपासून सुरुवात होईल. तात्काळ तिकीटमुळे ऐनवेळेस प्रवास करणाऱ्या प्रवासांची चांगलीच सोय होते. अनेकदा विविध कारणांमुळे ऐनवेळेस प्रवास करावा लागतो, अशावेळेस तात्काळ तिकीटचा पर्याय हा सर्वोत्तम ठरतो.

असं मिळवा तात्काळ तिकीट

तात्काळ तिकीट बूक करण्यासाठी सर्वात आधी तुम्हावा आयआरसीटीसी या वेबसाटवर अकाउंट तयार करावं लागले. अकाउंटसह लॉगीन केल्यानंतर ‘Plan My Journey’ येथे प्रवासासदंर्भात सर्व माहिती टाका. तुम्ही कुठून ते कुठपर्यंत प्रवास करणार आहात? प्रवासाची आणि परतीची तारीख ही माहिती अचूक टाका. त्यानंतर ‘Booking’ या टॅबध्ये तात्काळ हा पर्याय निवड. त्यानंतर एक्सप्रेस (गाडी नंबर) आणि अपेक्षित कोच (एसी/नॉन एसी) निवडा. त्यानंतर प्रवाशाचं नावं, वय, लिंग यासारखी माहिती भरा. तसेच आवश्यक डॉक्युमेंटही ठेवा.

त्यानंतर तिकाटीचे पैसे भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग हे पर्याय आहेत. सर्व व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रवाशाला तिकिटाबाबतची माहिती एसएमएस आणि इमेलद्वारे देण्यात येईल. मात्र सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कन्फर्म तात्काळ तिकीटवर रिफंड मिळणार नाही.

तात्काळ तिकीट बूकिंग सेवेचा फायदा असंख्य प्रवासी घेतात. त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच तिकीट बूक होतात. त्यामुळे अनेकांना तिकीटं मिळत नाहीत. ही गैरसोय टाळायची असेल तर तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल. तात्काळ तिकीट बूक करण्याआधीच लॉगीन करा. हाय स्पीड इंटरनेट वापरा. प्रवासाबाबतची संपूर्ण माहिती तयार ठेवा. तसेच तिकीटचे पैसे देण्यासाठी यूपीआय किंवा नेट बँकिंगचा पर्याय निवडा.

भारतीय रेल्वेकडून प्रवाशांच्या सोयीसाठी आणि गरेजनुसार हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे प्रवशांना आधीपेक्षा सहज आणि झटपट तात्काळ तिकीट मिळवता येईल, असा विश्वास रेल्वेला आहे.

खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स
खातेवाटपाचा तिढा, दिल्लीत फडणवीस-दादा पण शिंदे जाणार की नाही? सस्पेन्स.
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला
'मला गद्दार म्हणत होते, यांना काय गद्दार 2.. ', गुलाबराव पाटलांचा टोला.
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल
पवारांवर टीका करणाऱ्यावर बोलताना युगेंद्र पवारानी आपल्या काकाला फटकारल.
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?
शिंदे गटात मंत्रिपदावरून रस्सीखेच, 'या' 5 नेत्यांना पक्षातूनच विरोध?.
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?
सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन भाविकांसाठी इतके दिवस बंद, कारण नेमकं काय?.
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.