IRCTC NEWS : रेल्वे तिकीट बूकींग होईना, आता अनोखा सल्ला, बुकिंगसाठी इतर कंपन्यांची नावं सूचवली
भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट प्रणाली मंगळवार सकाळ पासून काम करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. याचा फटका कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना बसला आहे. रेल्वेने प्रवाशांना एक उपाय सुचविला आहे..
मुंबई | 25 जुलै 2023 : रेल्वेची ऑनलाईन तिकीट बुक करणारी यंत्रणा ( IRCTC NEWS ) मंगळवारी सकाळपासूनच ढेपाळली आहे. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रवाशांना आयआरसीटीसीच्या अधिकृत वेबसाईट आणि एपमधून तिकीट बुक करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना रेल्वेचे तिकीट बुक करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. आयआरसीटीसीने ही चूक मान्य करीत प्रवाशांना ट्वीटर हॅण्डल वरुन प्रवाशांना सल्ला देत मार्गदर्शन केले आहे. नेमके काय तांत्रिक अडचण येत आहे ते पाहूया….
भारतीय रेल्वेची ऑनलाईन ई- तिकीट प्रणाली मंगळवार सकाळ पासून काम करीत नसल्याचे उघडकीस आले आहे. याचा फटका कोट्यवधी रेल्वे प्रवाशांना बसला आहे. रेल्वेची तिकीट यंत्रणा सांभाळणाऱ्या आयआरसीटीसीची वेबसाईट आणि एपवरुन तिकीट बुक करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. तिकीट बुकींग आणि पेमेंट करताना या अडचणी येत आहेत.
irctc twitter handle
Due to technical reasons, the ticketing service is not available on IRCTC site and App. Technical team of CRIS is resolving the issue.
Alternatively tickets can be booked through other B2C players like Amazon, Makemytrip etc.
— IRCTC (@IRCTCofficial) July 25, 2023
रेल्वे प्रवाशांची ही अडचण ओळखून आयआरसीटीसीने प्रवाशांना ट्वीटर हॅण्डलवर माहीती दिली आहे, आयआरसीटीसीने म्हटले आहे की प्रवाशांनी तिकीट बुकींग करताना ‘आक्स दिशा’ Ask Disha हे ऑप्शन निवडण्यास सांगितले आहे. तसेच पेमेंट करताना वॉलेट Wallet हा पर्याय निवडण्यास सांगितले आहे.
रेल्वेने सुचवली खाजगी कंपन्यांची नावे
रेल्वे प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुक करताना IRCTC APP आणि WEBSITE अशा दोन्हींकडे तांत्रिक अडचणी येत आहेत. आयआरसीटीसीने आपली वेबसाईट बंद पडल्याने आपल्या प्रतिस्पर्धी इतर वेबसाईटची नावे सुचविली आहेत. यात एमेझॉन, मेकमाय ट्रीप अशा खाजगी तिकीट बुकींग एपची नावे रेल्वेच्या सरकारी यंत्रणेने सुचविल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.