देशातील पहिले एसी इकॉनॉमी क्लास डबे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रालातील ट्रेनमध्ये दिसणार आहेत.
अनेक टप्प्यांच्या चाचण्यांनंतर आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या परवानगीनंतर रेल्वे कोच फॅक्टरीतून 15 एसी इकॉनॉमी जबे रवाना झाली.
यातील 10 डबे उत्तर प्रदेशातील प्रयागराज आग्रा आणि झांसीच्या उत्तर मध्य रेलवे विभागाला मिळणार आहेत.
तसेच उर्वरित 5 डबे पश्चिम रेल्वेचं मुख्यालय असलेल्या मुंबईला मिळणार आहे.
त्यामुळे लवकरच उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात या एसी इकॉनॉमी डब्यांमध्ये प्रवास करायला मिळू शकतो.
भविष्यात भारतीय रेल्वे विभाग असे आणखी 248 डबे तयार करणार आहे.
भविष्यात भारतीय रेल्वे विभाग असे आणखी 248 डबे तयार करणार आहे. या डब्यांमध्ये सामान्य डब्यांपेक्षा अधिक आसनं आहेत. जुन्या जब्यांमध्ये 64 सीट असतात तर यात 72 सीट असतील
निर्मितीसाठीचा कमी खर्च आणि वाढलेली आसन व्यवस्था यामुळे या रेल्वेत प्रवास करणं स्वस्त ठरेल असंह बोललं जातंय. रेल्वे कोच फॅक्टरीने केवळ 3 महिन्यात 10 फेब्रुवारीला या डिझाईनचा आराखडा तयार केला होता. या डब्यांची रेल्वेने 180 किलोमीटर वेगाने तपासणी केलीय.