रेल्वेची प्रवाशांसाठी परवडणारी थाळी, सामान्यश्रेणीच्या प्रवाशांची होणार सोय

एकीकडे रेल्वेने महागड्या वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्याचा सपाटा लावला असताना आता भानावर आलेल्या रेल्वेने जनरल कोचच्या प्रवाशांनी परवडणारी थाळी सुरु केली आहे. 

रेल्वेची प्रवाशांसाठी परवडणारी थाळी, सामान्यश्रेणीच्या प्रवाशांची होणार सोय
affrodable meal for general passengerImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jul 20, 2023 | 5:34 PM

मुंबई | 20 जुलै 2023 : भारतीय रेल्वेने ( Indian Railway ) रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन सुविधा सुरु केली आहे. आता जनरल कोचमधून ( General Coach ) प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे परवडणाऱ्या दरात जेवण ( Affordable meal ) पुरविणार आहे. त्यामुळे जनरल तिकीटाने आयत्यावेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या  जेवणाची सोय आता भारतीय रेल्वेने केल्याने त्यांचा प्रवासाचा दर्जा वाढणार आहे. वाढत्या महागाईत आता रेल्वेने जनरल कोचच्या प्रवाशांच्या सोयीसाठी देशभरातील 64  स्थानकात ही सोय सुरु केली आहे. नेमकी काय आहे योजना पाहूयात…

इंडीयन रेल्वेने रेल्वे प्रवाशांना स्वस्त आणि मस्त जेवण पुरविण्यासाठी जनरल कोच जवळ फलाटांवर स्वस्त अन्नपदार्थांचे स्टॉल लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे जेवण रेल्वेची खानपान सेवा सांभारणारी आयआरसीटीसी किंवा जनआहार कॅटींनमधून तयार केलेले असून ते एल्यूमिनियमच्या फॉईलच्या छोट्या बॉक्समधून दिले जाणार आहे. रेल्वे बोर्डाचे फूड सर्व्हींग काऊंटर महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर जनरल कोचच्या डब्यांसमोरच लावले जाणार आहेत. त्यामुळे जनरल प्रवाशांना सोबत जेवण किंवा कुठल्याही महाग दराने जेवण विकत घेण्याची काहीही गरज नसणार अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.

असे असतील अन्नपदार्थ आणि किंमत

ही परवडणारी अन्नपदार्थांची पाकिटे दोन वर्गवारीतील असतील, पहिल्या इकॉनॉमी भोजनात 7  पुऱ्या (175 ग्रॅम ) आणि बटाटाची सुखी भाजी (150 ग्रॅम ), लोणचं (12 ग्रॅम ) असा भाजीपुरीचा बॉक्स 20 रुपयांत मिळेल. तसेच दुसऱ्या नाश्ता कॅटगॅरीत 50 रुपयांत प्रवाशांना साऊथ इंडीयन फूड (350 ग्रॅम ) राईस राजमा, छोले, खिचडी कुलचा, भटूरे, पाव-भाजी आणि मसाला डोसा असे पदार्थ पुरविले जातील. रेल्वेच्या या काऊंटरवर पिण्याचे पाणीही अगदी स्वस्तात मिळेल.

एकूण 64 स्थानकांवर सोय…

रेल्वेच्या देशभरातील 64 स्थानकांवर ही सोय सुरु करण्यात आली आहे. गुरुवारपासून आणखी 13 स्थानकांवर ही सुविधा सुरु करण्यात येणार आहे. या स्टॉलवर 200 एमएलचे पाण्याचे ग्लास देखील मिळती. जनरल डब्यांमध्ये गर्दी जास्त असल्याने त्यांची गैर सोय होऊ नये म्हणून जनरल कोचमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी ही सुविधा सुरु केली आहे. मध्य रेल्वेच्या लोकमान्य टीळक टर्मिनस, नागपूर, पुणे, मनमाड, खांडवा, भुसावळ या सहा स्थानकात सुविधा सुरु झाली आहे. लवकरच अन्य स्थानकांवरही परवडणारे अन्न आणि पाणी पुरविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.