Railway News : रेल्वे छोट्या स्थानकांना देणार नवी ओळख, प्रसिद्ध पर्यटनस्थळांशी स्थानकांची नावे जोडली जाणार
रेल्वेची तिकीटे ऑनलाईन बुक करताना स्टेशनचे नाव लक्षात नसले तरी चालणार आहे. तेथील प्रसिद्ध ठीकाणाचे नाव टाकताच नजिकच्या स्थानकांची नावे आता दिसणार आहेत. उद्यापासून रेल्वेच्या तिकीट बुकींग वेबसाईट आणि एपमध्ये हा बदल होणार आहे.
मुंबई | 20 जुलै 2023 : रेल्वे मंत्रालयाने छोट्या स्थानकांना नवीन ओळख देण्यासाठी नवा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. छोट्या स्थानकांना नजीकच्या प्रसिद्ध स्थळांशी जोडण्यात आल्याने या स्थानकांना नवी ओळख मिळेल, तसेच पर्यटनाच्यादृष्टीनेही फायदा होणार आहे. रेल्वेची तिकीट ऑनलाईन आरक्षण करताना आता संबंधित रेल्वेस्थानकाचे नाव टाईप करताच त्या स्थानकाच्या शेजारील प्रसिद्ध स्थळे आणि स्थानकांची नावे दिसणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना, पर्यटकांना तसेच नव्याने त्या ठीकाणी जाणाऱ्यांचा फायदा होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने छोट्या रेल्वे स्थानकांना प्रसिद्ध ठिकाणे तसेच स्थानकांशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. उदा. तुम्ही ऑनलाईन तिकीट काढताना जर पनवेल टाईप केले तर जवळचे प्रसिद्ध स्थानक म्हणून तुम्हाला मुंबईचे सीएसएमटी स्थानक दिसेल. सॅटेलाईट सिटी नोयडा टाईप केले तर तुम्हाला नवी दिल्ली स्थानक दिसेल. त्यामुळे पर्यटकांना तसेच नव्याने त्या ठिकाणी जाणाऱ्या त्या छोट्या स्थानकाबद्दल अधिक माहिती मिळेल, तसेच पनवेलहून मुंबईजवळ आहे हे देखील समजेल. अशा पद्धतीने सारनाथला बनारसशी जोडले जाईल, साबरमतीला अहमदाबाद स्थानकाशी जोडले जाईल. हा बदल रेल्वेच्या सॉफ्टवेअरमध्ये उद्यापासूनच करण्यात येणार आहे.
175 प्रसिद्ध स्थळांचे 725 स्थानकांशी मॅपिंग
पर्यटनाला उभारी देण्यासाठी एक आगळा वेगळा निर्णय घेतला आहे. जेव्हा प्रवासी तिकीट बुकींग करण्यासाठी रेल्वेची वेबसाईट किंवा मोबाईल एपवर जातील तेव्हा त्यांना छोट्या स्थानकाच्या नाव टाईप करताच त्या स्थानकापासून जवळ असणाऱ्या स्थळांची आणि स्थानकांची यादीच दिसेल. त्यामुळे तुम्हाला एक प्रकारे मार्गदर्शन मिळेल. अशा एकूण 175 प्रसिद्ध स्थळे आणि शहरांचे मॅपिंग देशातील रेल्वेच्या 725 स्थानकांशी करण्यात येणार आहे.
railway twitter
Indian Railways adopts innovative approach of linking Popular Area with Station Name for Passenger Convenience
The new approach would yield better planning of journey and personalized passenger experience in ticket booking on website and Mobile app
Read here:… pic.twitter.com/kCNJXUkeS0
— PIB India (@PIB_India) July 20, 2023
तिकीट यंत्रणेत उद्यापासून बदल
रेल्वे मंत्रालयाने छोट्या स्थानकांना नवीन ओळख देण्यासाठी तसेच हा नवा बदल रेल्वेच्या तिकीट यंत्रणेत उद्या 21 जुलैपासून होणार आहे. या नव्या रचनेमुळे पर्यटनाला निघणाऱ्यांना त्यांचे नियोजन करताना फायदा होईल. रेल्वेच्या वेबसाईटवर ई – तिकीट बुक करताना स्थानक निवडताच त्याच्या शेजारील प्रसिद्ध स्थळे आणि स्थानकेही दिसतील. इलेक्ट्रॉनिक रिझर्व्हेशन स्लिपवरही हा बदल दिसेल.
प्रवाशांचा असा फायदा होणार
1 ) रेल्वे प्रवासाचे नियोजन करताना अधिक चांगले नियोजन अनुभव मिळेल
2) पर्यटकांचा सोय होईल
3) पर्यटकांना स्थानक शोधताना फायदा
4 ) काशी, बद्रीनाथ, केदारनाथ, वैष्णोदेवी आदी स्थळांच्या जवळील स्थानके दिसतील
5 ) रेल्वेस्थानकांशी पर्यटन स्थळे जोडल्याने धार्मिक स्थळांचे महत्व वाढेल आणि नागरिकांना अभिमान वाटेल