Railway Ticket | प्रवाशांना एकदम झटपट तिकीट, रांगेत उभं राहण्याची झंझट संपली
Railway Ticket | रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीवर एकच गर्दी उसळली आहे. सणासुदीत तर प्रवाशांना तिकीट खरेदी करताना लांबच लांब रांगेत वेळ खर्ची करावी लागतो. पाय दुखतात. पण लवकर क्रमांक लागत नाही. कधी कधी तर ट्रेन पण सुटून जाते. पण भारतीय रेल्वेने या समस्येवर खास उपाय आणला आहे.
नवी दिल्ली | 24 ऑक्टोबर 2023 : सणासुदीत भारतीय प्रवाशांना गाव गाठण्यासाठी, घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. त्यांना मोठे टप्पेटोणपे खात प्रवास करावा लागतो. पॅसेंजर प्रवाशांचे तर मोठे हाल होतात. प्रवासापूर्वी रेल्वे स्टेशनच्या तिकीट खिडकीपासून खरी परीक्षा सुरु होते. अनेकांना लांबच लांब रांगेत उभं रहावं लागते. त्यानंतर तिकीटाच्या सुट्या पैशांवरुन वाद होतो तो वेगळा. कधी कधी या गडबडीत ट्रेन पण निघून जाते. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. गेल्या काही दिवसांपासून रेल्वेत जोरदार सुधारणा सुरु आहेत. लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची लवकरच मुक्तता होणार आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने खास सुविधा देण्याचा चंग बांधला आहे.
क्यूआर कोडचे गिफ्ट
भारतीय प्रवाशांना आता लाबंच लांब रांगेत उभं राहण्याची आवश्यकता नाही. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वेने QR Code ची सुविधा आणली आहे. Railway UTS App च्या माध्यमातून प्रवाशांना अनारक्षित तिकीट बूक करता येणार आहे. त्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहण्याची गरज नाही. सिझन तिकीटांचं नुतनीकरण आणि प्लॅटफॉर्म तिकीट पण चुटकीत खरेदी करता येईल.
कसं वापरणार UTS App
- App डाऊनलोड करुन तुमची नोंदणी करा
- मोबाईल क्रमांक, नाव, लिंग, जन्मतारीख ही माहिती भरा
- ओटीपीद्वारे ही प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करता येईल
- रजिस्ट्रेशननंतर स्क्रीनवर एक विंडो उघडेल
- त्याआधारे तिकीट बुकिंग, कॅन्सल तिकीट, बुकिंग हिस्टी, वॉलेटसह इतर पर्याय दिसतील
तिकीट विंडोवर क्यूआर कोड
स्टेशनच्या तिकिट विंडोवर क्यूआर कोड असतील. या ठिकाणी प्रवाशांना त्यांच्या युटीएस एपच्या सहाय्याने हा क्यूआर कोड स्कॅन करावा लागेल. क्यूआर कोड स्कॅन झाल्यावर प्रवाशांना त्यांच्या डिजिटल पेमेंट वॉलेटमधून तिकीटाचे पैसे देता येतील. त्यामुळे तिकीटासाठी खिडक्यांवर गर्दीत उभं राहण्याची गरज राहणार नाही.
पॅसेंजर ट्रेनच्या प्रवाशांना मोठा दिलासा
पॅसेंजर ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना हे एप उपयोगी आहे. त्यामुळे त्यांना नाहक एक्सप्रेसचं तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. तसेच लांबच लांब रांगेत उभं राहण्याची गरज नाही. जनरल पॅसेंजरने या एपच्या माध्यमातून तिकीट खरेदी केली. त्यासाठी डिजिटल वॉलेटचा वापर केल्यास त्याला पाच टक्क्यांपर्यंतचा बोनस पण मिळतो. गुगलपे, फोनपे, पेटीएम वा इतर डिजिटल एपचा वापर करता येतो.