Indian Railway: यात्रीगण कृपया ध्यान दें! प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला गेले असल्यास काळजी करू नका, अशा प्रकारे नुकसान भरून काढले जाईल
प्रवास करताना सामान चोरीला गेलंय, कशाला चिंता करताय, वाचा सरकारचा नवा नियम
मुंबई : प्रवास (Travel) करीत असताना अनेकांचं सामान (Luggage) आतापर्यंत चोरीला गेलंय, काहींच्या तर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहे. अनेक प्रकारात चोरट्यांना शिक्षा होऊनही अशा घटना घडत असतात. परंतु आता प्रवास करीत असताना तुमचं सामान चोरीला गेलंय तर अजिबात घाबरु नका. रेल्वेकडून (Indian Railway) एक नवी आयडीया प्रवासासाठी आणली आहे. त्या योजनेचा फायदा सगळ्या प्रवाशांना होणार आहे.
समजा, तुम्ही एखाद्या रेल्वेच्या स्थानकात आहात, किंवा रेल्वेने तुम्ही कुठे प्रवास करीत आहात. त्यादरम्यान तुमचं सामान चोरीला गेल्यास त्याची तक्रार तुम्ही रेल्वेच्या संबंधित विभागाकडे करु शकता. त्याचबरोबर सामानाची नुकसान भरपाई सुद्धा मागू शकता.
रेल्वेने त्यांच्या अधिकृत साईटवरती एक माहिती दिली आहे. त्यामध्ये तुमचं सामान चोरीला गेले असल्यास किंवा दरोड्याची घटना घडली असल्यास संबंधित ट्रेन कंडक्टर, कोच अटेंडंट, गार्ड किंवा जीआरपी यांच्याकडे तक्रार दाखल करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक अर्ज देण्यात येईल. तो तात्काळ भरावा.
त्यानंतर तुमच्या सामानाची शोधाशोध केली जाईल, तुमचं सामान कुठेही सापडलं नाही, तर तुमच्या नुकसान भरपाईची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
रेल्वे विभागाकडून चोरीला गेलेलं सामान परत करण्यासाठी एक नवी प्रणाली सुरु केली आहे. त्या प्रणालीद्वारे चोरीला गेलेल्या सगळ्या सामानाची नोंद करता येते.