Indian Railway : लहान मुलांनी रेल्वेला केले मालामाल, इतक्या कोटींचा जमवला गल्ला
Indian Railway : भारतीय रेल्वेला लहान मुलांनी मालामाल केले हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण हे खरे आहे. रेल्वेने एक दोन नाही तर काही हजार कोटी रुपयांची कमाई केली आहे. एका नियमात केलेला बदल रेल्वेच्या पथ्यावर पडला आणि रेल्वेला मोठा फायदा झाला. 2016 मध्ये रेल्वेने हा नियम बदलला होता.
नवी दिल्ली | 24 सप्टेंबर 2023 : भारतीय रेल्वे (Indian Railway) लहान मुलांमुळे मालामाल झाली. रेल्वेने जबरदस्त कमाई केली. काही हजार कोटी रुपये रेल्वे विभागाने कमावले. 2016 मध्ये रेल्वेने एक नियम बदलला होता. तो रेल्वेच्या पथ्यावर पडला. सेंटर फॉर रेलवे इन्फॉर्मेशन सिस्टम्सकडे माहिती अधिकारात याविषयीची माहिती मागण्यात आली होती. त्याला रेल्वे खात्याने उत्तर दिले. यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने दिलेल्या विशेष सवलती बंद केल्या. त्यातून पण रेल्वे खात्याला मोठी कमाई झाली. अनेक सवलती रेल्वेने बंद केल्या आहेत. त्याचा चांगलाच फायदा झाला आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या या बदलांमुळे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये रेल्वे खात्याला 560 कोटी रुपयांची कमाई (Income) करता आली.
कसा झाला फायदा
7 वर्षांपूर्वी लहान मुलांच्या प्रवास भाड्यासंबंधी रेल्वे विभागाने नियमात (Railways child travel rules) बदल केला होता. त्यानुसार, भारतीय रेल्वेने एका निश्चित वयाच्या मुलांना रेल्वे प्रवासासाठी भाडे आकारण्यास सुरुवात केली होती. गेल्या सात वर्षांत रेल्वेला यामाध्यमातून 2800 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई करता आलेली आहे.
हा केला होता बदल
31 मार्च, 2016 रोजी रेल्वे मंत्रालयाने याविषयीची घोषणा केली होती. त्यानुसार, 5 वर्ष आणि 12 वर्षांच्या मुलांसाठी रिझर्व्ह कोचमध्ये वेगळ्या बर्थसाठी वा सीटसाठी पूर्ण भाडे घेण्याचे ठरविण्यात आले. रेल्वे खात्याने हा नियम 21 एप्रिल 2016 रोजीपासून लागू केला. त्यानंतर माहिती अधिकारात या बदललेल्या नियामातून किती नफा कमावला गेला याची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार गेल्या 7 वर्षात रेल्वेने 2800 कोटी रुपयांची अतिरिक्त कमाई केली आहे.
पूर्वी काय होता नियम
यापूर्वी रेल्वे 5 ते 12 वर्षांच्या मुलांकडून रेल्वे खाते अर्धे भाडे वसूल करत होते. तर अन्य पर्यायामध्ये पण लहान मुलांकडून अर्धेच भाडे वसूल करण्यात येत होते. CRIS ने माहिती अधिकारात श्रेणीनुसार, कमाईचे आकडे दिले आहेत. आर्थिक वर्ष 2016-17 ते 2022-23 या काळात 3.6 कोटींहून अधिक मुलांनी रिझर्व्ह सीट अथवा बर्थ पर्यायाच्या आधारे अर्ध्या तिकिटावर प्रवास केला. तर 10 कोटींहून अधिक मुलांनी स्वतंत्र बर्थ वा सीटचा पर्याय निवडत पूर्ण भाडे दिले.