प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेचे सुपर ॲप, एका क्लिकवर मिळणार या सुविधा

भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी एक सुपर ॲप लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे ॲप IRCTC, Rail Madad आणि इतर अनेक रेल्वे सेवा एकत्रित करेल. प्रवाशांना तिकिट बुकिंग, जेवण ऑर्डरिंग, ट्रेन माहिती आणि तक्रारी दाखल करणे यासारख्या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळतील. यामुळे प्रवाशांचा वेळ आणि मेहनत वाचेल आणि रेल्वे प्रवास अधिक सुलभ होईल.

प्रवाशांच्या सेवेसाठी रेल्वेचे सुपर ॲप, एका क्लिकवर मिळणार या सुविधा
railway super app
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 8:37 PM

भारतीय रेल्वेने सुपर ॲप तयार करून रेल्वे प्रवास सुलभ करण्यासाठी काम करत आहे. आधी वंदे भारत एक्सप्रेस आणि आता रेल्वे सुपर ॲप लाँच करणार आहे. या ॲपच्या मदतीने रेल्वेच्या विविध सेवा प्रवाशांना एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहेत. आत्तापर्यंत रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी IRCTC, IRCTC केटरिंग फॉर फूड आणि Rail Madad सारखी ॲप्स आवश्यक होती, पण जेव्हा रेल्वेचे हे सुपर ॲप लाँच होईल तेव्हा या सेवांसोबतच इतरही अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. ॲपच्या मदतीने रेल्वे सेवा ऑनलाईन पद्धतीने मिळवण्यासाठी याच ॲपद्वारे प्रवाशांना नोंदणी करुन सेवांचा लाभ घेता येईल .

सुपर ॲप कसे असेल?

आतापर्यंत ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी आयआरसीटीसी ॲपची मदत घेतली जात होती आणि ट्रेनचा लोकेशन जाणून घेण्यासाठी नॅशनल ट्रेन इन्क्वायरी सिस्टम ॲपची मदत घ्यावी लागते.तसेच तक्रारीसाठी १३९ नंबर डायल करावा लागायचा. अशा किचकट परिस्थितीमुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होते, अशा स्थितीत रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे.

रेल्वेच्या सुपर ॲपद्वारे, प्लॅटफॉर्म तिकीट, ट्रेनच्या वेळा आणि इतर अनेक सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध असतील. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या CRIS आणि IRCTC एकत्र करण्याचे काम सुरू आहे. CRIS भारतीय रेल्वेला तांत्रिक सहाय्य पुरवण्याचे काम करते.

सध्याची व्यवस्था काय आहे?

सध्या रेल्वे प्रवाशांना विविध ॲप्स आणि वेबसाइट्सचा वापर करावा लागतो. तिकिटांसाठी IRCTC, खानपानासाठी IRCTC eCatering, अभिप्राय किंवा मदतीसाठी Rail Madad, अनारक्षित तिकिटांसाठी UTS आणि ट्रेन ट्रॅक करण्यासाठी NTES. या ॲपची मदत घ्यावी लागत आहे.

प्रवाशांचा मोठा फायदा

दररोज लाखो प्रवासी एक्सप्रेसने प्रवास करत असतात. त्यांना यावेळी अनेक गैरसोयींनाही सामोरे जावे लागते. त्यामुळे या प्रवाशांना तीन तीन सुविधा एकाच क्लिकवर मिळाल्याने त्यांचा मोठा फायदा होणार आहे. मोठ्या गैरसोयीतून त्यांची सुटका होणार आहे. शिवाय गर्दीत थांबण्याची कटकट दूर होणार आहे. वेळेची बचतही होणार आहे. तसेच जेव्हा भूक लागेल तेव्हा अन्न पदार्थ मागवण्याची सोयही झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी ही अत्यंत चांगली आणि दिलासा देणारी गोष्ट आहे.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....